रुणाल जरे यांच्या उपोषणाला भूमाता ब्रिगेडने दिला आपला जाहीर पाठिंबा

0 11

अहमदनगर –   यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या कारकर्त्या  रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ  बोठे याला पारनेर येथील न्यायालयाने फरार घोषित केले आहे, मात्र आरोपीला अजून अटक केली नाही, आरोपीला अटक करावी या मागणीसाठी रेखा जरे यांच्या मुलगा उपोषणाला बसलंय या उपोषणाला भूमाता ब्रिगेडने जाहीर पाठिंबा दिला आहे.

ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी राज्य शासनाची सकारात्मक भूमिका – अजित पवार 

भूमाता ब्रिगेड अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी रेखा जरे यांच्या मुलाच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला अटक करा आणि त्याच्या मालमत्तेच्या जप्तीचे आदेश द्या, आणि त्याला सहकार्य करणाऱ्या लोकांना देखील अटक करा अशी मागणी देसाई यांनी केली आहे. रेखा जरे हत्याकांड प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींच्या विरोधात पोलिसांनी 26 फेब्रुवारी रोजी  पारनेर येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. फरार आरोपी पत्रकार बाळ बोठे याला पकडल्यानंतर किंवा तो हजर झाल्यानंतर त्याच्या विरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.

जो पर्यंत बाळ बोठेला अटक करत नाही तो पर्यंत उपोषण सोडणार नाही  – रुणाल जरे

Related Posts
1 of 1,290

अहमदनगर – पुणे महामार्गावर जातेगाव घाटात 30 नोव्हेंबरला रेखा जरे यांची गळा चिरुन निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी ज्ञानेश्वर उर्फ शिवाजी शिंदे, फिरोज राजू शेख, आदित्य सुधाकर चोळके, सागर भिंगारदिवे, ऋषिकेश पवार या पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे.  रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ  बोठे याला पारनेर येथील न्यायालयाने फरार घोषित केले आहे, मात्र आरोपीला अजून अटक केली नाही, आरोपीला अटक करावी या मागणीसाठी रेखा जरे यांच्या मुलगा उपोषणाला बसलंय या उपोषणाला भूमाता ब्रिगेडने जाहीर पाठिंबा दिला आहे.

महिलेला बंदुकीचा धाक दाखवून लैंगिक शोषण करणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: