भोसरी जमीन घोटाळा प्रकरण , एकनाथ खडसेंना मोठा दिलासा

0 311

 पुणे –    भारतीय जनता पक्षा (BJP) ला राम राम ठोकून राष्ट्रवादीत (NCP) आलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एक मोठा दिलासा मिळाला आहे. एक आठवडा अटकेपासून संरक्षण देण्यात आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे.(Bhosari land scam case, great relief to Eknath Khadse)

मागच्या दोन तीन दिवसापूर्वी या प्रकरणात एकनाथ खडसे यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं.या प्रकरणी त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, सुनावणीदरम्यान त्यांचा अर्ज फेटाळून लावत त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली होती. अंजली दमानिया यांनीच यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, त्याचवेळी एकनाथ खडसे यांना मात्र वैद्यकीय कारणांमुळे दिलासा मिळाला होता. त्यांच्याबाबत पुढील सुनावणी येत्या आज झाली. या सुनावणीनंतर हा निकाल देण्यात आला.

ड्रग्स पार्टी प्रकरणात अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरावर एनसीबीचा छापा

 काय आहे प्रकरण 

Related Posts
1 of 1,494

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावाई गिरीश चौधरी यांनी २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी एमआयडीसी येथील सव्‍‌र्हे क्र. ५२/२ अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद केली. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या व त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झालेले आहेत. या सर्व व्यवहारात सुमारे ६१ कोटी रुपयांच्या महसुलाचं नुकसान झालं असून हा मोठा गैरव्यवहार असल्याचा ‘ईडी’ला संशय आहे. (Bhosari land scam case, great relief to Eknath Khadse)

हे पण पहा –  ‘नगरच्या मंत्र्याचा पापाचा घडा भरलाय’ | विखे म्हणतात, ‘रुको जरा सबर करो!’

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: