
श्रीगोंदा :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोलेजी व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल दादा राऊत यांच्या मार्गदर्शनाने व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री.प्रशांत भैय्या ओगले यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदयात इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने भोंगा आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती प्रशांत ओगले यांनी दिली आहे.
केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या निर्णयांनमुळे इंधन दरवाढ गगनाला भिडलेली आहे महागाईचा हा वाढता आलेख म्हणजे सामान्य जनतेची आर्थिक पिळवणुकच आहे. यामध्ये गँस,डिझेल,पेट्रोल इंधनाचे वाढलेले दर हे न परवडणारे आहेत त्यामुळे सर्व सामान्य लोकांचे व शेतकरी वर्गाचे कंबरडे मोडले असून अनेकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे याच्या निषेधार्थ गांधी पेट्रोल पंप श्रीगोंदा, या ठीकाणी 30 एप्रिल रोजी सकाळी ठिक 10 वाजता केंद्रातील गाढ झोपलेले “भाजपा सरकारला जाग आणण्यासाठी श्रीगोंदा तालुका युवक काँग्रेसच्या वतीने अंदोलन करण्यात येणार आहे तरी सर्वांनी जास्त प्रमाणात उपस्थित रहावे.असे आवाहन प्रशांत भैय्या ओगले,उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस यांनी केले आहे.
भाजप सरकार नाही तिथे इंधन महाग
भारत सरकार मध्ये भाजप पक्षाची ज्या राज्यात सत्ता नाही त्या राज्यात इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत आणि ज्या राज्यात सत्ता आहे त्या राज्यात इंधनाचे दर नियंत्रणात आहेत त्यामुळे केंद्र सरकारच्या जाणूनबुजून जनतेला वेठीस धरत आहे असेही ओगले यांनी बोलताना सांगितले.