भोंदू बाबांनी घातला लाखोंचा गंडा;मात्र तेरी भी चूप अन् मेरी भी चूप

श्रीगोंदा :- श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडे या ठिकाणी भोंदू बाबांनी लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याबाबत मात्र अजूनपर्यंत कोणीही समोर येऊन तक्रार करत नसल्याने या प्रकरणात ‘तेरी भी चूप अन मेरी भी चूप ‘असे चित्र पाहण्यास मिळत आहे.
Related Posts
श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडे या ठिकाणी वाळुंज वस्तीवर दोन अज्ञात लोक म्हणजे महाराज आले त्यांनी परिसराचा अंदाज घेतला आणि कोणाला सांगितले नारायण नागबळी करावी लागेल त्यासाठी मटेरियल घेऊन येण्यासाठी 5 हजार रुपये द्यावे लागतील तसेच कोणाला पितृदोष आहे त्यातून घराला सुख मिळत नाही कोणाच्या घरात शांती घालावी लागेल संतती होत नसेल तर पूजा अर्चा करावी लागेल. तसेच सर्व काही सुख मिळवायचे असेल तर यज्ञ करावा लागेल असे अनेकांना सांगून वाळुंज वस्तीवरील अनेक महिलांकडून लाखो रुपये घेऊन त्या दोन महाराजांनी पोबारा केला आहे. त्या महाराजांचे मोबाईल नंबर आता ते उचलत नसल्यामुळे आता आपली फसवणूक झाली आहे असे महिलांच्या लक्षात आले .
त्यानंतर एकमेकींच्या भेटी झाल्यावर सर्वजण फसलो आहेत हे लक्षात आले मात्र याबाबत गावातील महिलांनी अथवा लोकांनी याबाबत कोठेही तक्रार दिली नाही. त्यामुळे या प्रकरणात ‘तेरी भी चूप अन मेरी भी चूप ‘असेच चित्र पाहण्यास मिळत आहे मात्र या सर्व प्रकारात अज्ञात भोंदू बाबांनी लाखो रुपये कमावले हे मात्र नक्कीच ! अश्या घटनांना आवर घालण्यासाठी विविध प्रकारच्या संघटनांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.