DNA मराठी

भिंगारही महापालिका हद्दीत येणार……………….

देहू, देवळाली, अहमदनगर, औरंगाबाद व कामठी कॅन्टोन्मेंट बोर्ड ही ७ कॅन्टोन्मेंट बोर्ड आपल्या महानगरपालिकांच्या क्षेत्रात समाविष्ट

0 12
Bhingar will also come under the municipal limits dna news marathi

नगर : भिंगार कॅटॉनमेंट बोर्ड महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याच्या शासनाच्या हालचाली सुरु झाल्याचे पत्रच जारी झाले आहे. राज्याचे नगर विकास विभागाच्या उपसचिव सुशिला पवार यांच्या स्वाक्षरीने जारी झालेले आहे. या पत्रात म्हटले आहे की, या पत्रान्वये मागविण्यात आलेले आपले अहवाल शासनास अद्यापही अप्राप्त आहे.

Ahmednagar Crime :- गुप्ती व फायटर बाळगणारा जेरबंद…

केंद्र शासनाच्या संदर्भाधीन २३ मे २०२२ व २७ डिसेंबर २०१२ च्या पत्रास अनुसरून पुणे कॅटॉनमेंट बोर्ड, खसकी कंटोनमेंट बोर्ड, देहू कॅन्टोन्मेंट बोर्ड, देवळाली कंटोनमेंट बोर्ड, अहमदनगर कॅटॉनमेंट बोर्ड, औरंगाबाद कॅन्टोन्मेंट बोर्ड व कामठी कॅन्टोन्मेंट बोर्ड ही ७ कॅन्टोन्मेंट बोर्ड आपल्या महानगरपालिकांच्या क्षेत्रात समाविष्ट करावे किंवा कसे याबाबत आपले स्पष्ट मत मागविण्यात आले आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सध्याचे क्षेत्र व लोकसंख्या किती व ही कॅन्टोन्मेंट बोर्ड आपल्या महानगरपालिकेच्या क्षेत्रात समाविष्ट झाल्यास, आपल्या महापालिकेचे सुधारीत क्षेत्र व लोकसंख्या किती होईल आदी बाबींच्या सविस्तर तपशिलासह आपले अभिप्राय तात्काळ ई-मेलद्वारे शासनास सादर करावेत, अशी ही विनंती या आदेशात केलेली आहे.

Related Posts
1 of 2,528

Ahmednagar news श्रीरामनवमी उत्सवानिमित काढण्यात येणार्या शोभायात्रेवर सीसीटीव्हीचा वॉच

हे पत्र उपसचिव सुशिला पवार यांच्या स्वाक्षरीने जारी झालेले आहे. शहराची हद्द वाढणार आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने शहरातील प्रभागांची रचना होणार आहे. शहरासह भिंगारचा विकास करणे आता सोपे होणार आहे. भिंगार शहर हद्दीत येणार असल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. भिंगार कॅटॉनमेंट बोर्ड निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली होती. त्यानंतर ही प्रक्रिया थांबविण्यात आली. आज त्याचे कारण स्पष्ट झाले आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: