राघोहिवरेच्या सरपंच पदी भाऊसाहेब दहिफळेंना पुन्हा एकदा मिळणार संधी

0 9

मिरी: पाथर्डी तालुक्यातील राघोहिवरे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाल्यानंतर याठिकाणी विजयी झालेल्या शनैश्वर ग्रामविकास मंडळाच्या सर्व सदस्यांनी पुन्हा एकदा माजी सरपंच भाऊसाहेब आसराजी दहिफळे यांच्याच नावाला पसंती देऊन त्यांची सरपंच म्हणून निवड जाहीर केली आहे.

एकुण सात सदस्य असलेल्या राघोहिवरे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी सरपंच भाऊसाहेब दहिफळे यांनी इच्छा नसताना देखील सहकार्यांच्या आग्रहाखातर शनैश्वर ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून सात उमेदवार उभे करून मागील काळात केलेल्या विकासकामांच्या जोरावर व ग्रामस्थांशी असलेल्या ऋणानुबंधामुळे चार जागा जिंकत बहुमत मिळवले होते.नवनिर्वाचित सदस्य असलेले गोरक्ष लबडे,सौ.मंगल कराळे व सौ.मिना ढवळे यांनी राघोहिवरे ग्रामपंचायती साठी खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर होताच माजी सरपंच भाऊसाहेब दहिफळे यांची सरपंच म्हणून एकमताने निवड जाहीर केली आहे.दहिफळे यांची निवड जाहिर होताच राघोहिवरे गावात फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे.

गावातील महिलांनी देखील नवनिर्वाचित सरपंच दहिफळे यांचे औक्षण करून निवडीचे स्वागत केले आहे.आपण व आपल्या कुटुंबाने गावतील अनेक नागरीकांना तन-मन-धनाने अडचणीच्या काळात मदत केली असून गावच्या स्मशानभूमीसाठी देखील स्वामालकीची जागा देऊन गावात भरीव विकासकामे केली असून त्याचीच पावती म्हणून ग्रामस्थांनी मला पुन्हा सरपंच पदाची संधी मिळवून देऊन विरोधकांच्या जातीयवादी प्रचाराला नाकारले असल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित सरपंच भाऊसाहेब दहिफळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे.

Related Posts
1 of 1,292

यावेळीसुखदेव जाधव,भरत गिर्हे,बाळासाहेब कुर्हे,दिलीप कुर्हे,जब्बर कुर्हे,विक्रम होंडे,आण्णासाहेब होंडे,सुखदेव कुर्हे,अशोक नरवडे,संभाजी कोंडीबा वांढेकर,मोहन नरवडे,सतीश कुर्हे,सतीश होंडे,चिमाजी वांढेकर,शांताराम गायकवाड,संजय कुर्हे,देवीदास मराठे,गणेश गिर्हे,शरद कुर्हे,अंकुश कुर्हे,गवळी कुर्हे व हरिभाऊ जरे आदींसह कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: