भैरवनाथ सहकार विकास पॅनल च्या प्रचाराची धुरा तरुणांच्या हाती…

0 80

 

बेलवंडी- भैरवनाथ बेलवंडी सहकारी सोसायटी निवडणूक अगदी 2 दिवसावर येऊन ठेपली असुन सत्ताधारी व विरोधी गटाचे उमेदवार पायाला भिंगरी बांधून प्रचार करत आहेत. प्रचार यंत्रणा हायटेक झाली असून आरोप प्रत्यारोप च्या फैरी सुरू झाल्या आहेत. या निवडणुकीत भैरवनाथ सहकार विकास पॅनल ची प्रचाराची धुरा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांचे चिरंजीव ऋषिकेश शेलार हे सांभाळत आहेत.

रोज सकाळी 6 वाजलेपासून 100 ते 150 तरुण युवक सोबत घेऊन सभासद शेतकरी यांच्या भेटी घेऊन ऋषिकेश शेलार हे भैरवनाथ सहकार विकास पॅनलचा हायटेक प्रचार करताना दिसत आहे.मोठ्या प्रमाणावर तरुण या निवडणुकीत उतरल्याने सभासद आश्चर्य चकित झाले आहेत. या प्रचार यंत्रणेला शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

11 जून रोजी या निवडणूक प्रक्रियेसाठी दुपारी 3 पर्यंत मतदान होत असून दुपारी 3 नंतर लगेच मतमोजणी ला सुरवात होणार असून संध्याकाळी निवडणूक निकाल जाहीर होणार असल्याने बेलवंडी सोसायटी चे सभासद कोणाच्या बाजूने कौल देणार हे निकालानंतर स्पष्ट होईल.

Related Posts
1 of 2,139

ऋषिकेश शेलार यांच्या प्रचार यंत्रणेचा विरोधकांनी घेतला धसका ?

नागवडे कारखाण्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांचे चिरंजीव पृथ्वीराज व दिग्विजय यांनी कारखाना निवडणुकीत प्रचार यंत्रणा सक्रिय केली होती.
अगदी त्याच प्रकारे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांचे चिरंजीव ऋषिकेश शेलार यांनी देखील 150 ते 200 तरुण युवकांची फौज तयार करून प्रचार यंत्रणा हायटेक केली आहे.साधी राहणी , प्रेमाने बोलणे, वडीलधाऱ्या व्यक्तींच्या पाया पडणे यातून तरुण आकर्षित होताना दिसून येत आहेत.त्यास सभासद व शेतकरी वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांनी या यंत्रणेचा धसका घेतला असल्याची चर्चा परिसरात होत आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: