विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर बेलवंडी पोलिसांची धडक कारवाई

0 11
श्रीगोंदा  :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव परत वाढू लागल्याने अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी केलेल्या आवाहनानुसार बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी सोमवारी रस्त्यावर उतरून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विनामास्क फिरणाऱ्याच्या विरोधात बेलवंडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत चिंभळा चौक, बेलवंडी एसटी स्टँड , शिरूर रोड, बेलवंडी फाटा, गव्हाणेवाडी ,या ठिकाणी  जनजागृती करत धडक कारवाई सुरू केली .

सावधान ; कोरोना वाढतोय ,नागरिकांनी सतर्क राहण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे  यांनी श्रीगोंदे तालुक्यात वाढलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत   ठीक ठिकाणीं तसेच बस स्थानक परिसर, महाविद्यालये, शाळा परिसरात जनजागृती करत विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. यावेळी शहरात विना मास्क फिरणाऱ्या १०० नागरिकांकडून सुमारे १० हजार रूपये दंड आकारणी करत त्यांना मास्क, सेनेतायझर, तसेच सोशल दिस्टांस ठेवण्याचे आवाहन केले.पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी संतोष गोमसाळे, हसन शेख,दादा क्षीरसागर, विकास कारखीले, भाऊसाहेब शिंदे आदींनी काम केले .
Related Posts
1 of 1,290

व्हायरल व्हिडिओतील त्या व्यक्तीवर कारवाई करुन पारधीसमाजाची बदनामी थांबवावी- आदिवासी पारधी परिवर्तन परिषदेची मागणी

बेलवंडी  पोलिस स्टेशनमध्ये नुकतेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे  हे हजर झाल्यापासून अवैध  धंद्यावाले व गुन्हेगारावर वचक बसविला असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून त्याचे कौतुक होत आहे.

ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्याची मागणी 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: