इंस्टाग्रामवर ओळख करून महिलेला 10 लाखांना गंडा, गुन्हा दाखल

0 189

पुणे –   देशासह राज्यात महिलाना ऑनलाईन (Online) ओळख करून त्यांना फसवण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे.  काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील एका उच्च शिक्षण घेतलेल्या महिलेला देखील टिंडर (Tinder) या डेटिंग अॅपवर (dating app) ओळख करून  73 लाख 59 हजार 530 रुपयांची फसवणूक (Cheating) करण्यात आली होती.

ही घटना ताजी असताना परत एकदा पुणे (Pune) मध्ये एका महिलेची  सव्वा दहा लाख रुपयांची फसवणूक झाली असल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात महिलेने  चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Related Posts
1 of 1,481
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार पुणे मधील एका ४७ वर्षीय महिलेला इंस्टाग्राम (Instagram) या सोशल मीडिया (Social media) अॅपवरून आधी ओळख निर्माण करून त्याला आपण परदेशातून पाठवलेले गिफ्ट सोडवून घेण्याच्या बहाण्याने आरोपीने महिलेची तब्बल सव्वा दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.  ही घटना 2 ते 29 एप्रिल 2021 दरम्यान घडली आहे. आरोपीने परदेशात पायलट असून भेटवस्तू पाठवत असल्याचं सांगितलं होत. मात्र आपली फसवणूक होत असल्याची जाणीव झाल्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: