निवडणुकीपूर्वीच ‘या’ राज्यात केजरीवाल यांना भाजपने दिला मोठा धक्का

0 298
Before the election, BJP gave a big blow to Kejriwal in this state

प्रतिनिधी- DNA मराठी टीम 

 दिल्ली –  नुकताच पंजाब विधानसभा निवडणुकीमध्ये (Punjab Assembly Election)धमाकेदार विजय प्राप्त केल्यानंतर आता आम आदमी पक्ष (AAP) गुजरात (Gujarat) आणि हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh)राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलं आहे . मात्र भारतीय जनता पक्षाने(BJP) हिमाचल प्रदेशमध्ये आम आदमी पक्षाला मोठा धक्का दिला आहे.  काल रात्री उशिरा धक्कादायक घडामोडीत भाजपने आपच्या हिमाचल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनूप केसरी (Anoop Kesari)आणि संघटनेचे सरचिटणीस सतीश ठाकूर (Satish Thakur) यांना पक्षात सामील करून घेतले.

त्यांच्यासोबत उना अध्यक्ष इक्बाल सिंग यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. काल रात्री उशिरा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर या तीन नेत्यांसह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या घरी पोहोचले. या आठवड्यात अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांनी हिमाचलमध्ये रोड शो करून आपली ताकद दाखवून दिली होती.
Related Posts
1 of 2,357
मनीष सिसोदिया यांनी दावा केला होता की, भाजपला जयराम ठाकूर यांना बदलून अनुराग ठाकूर यांना मुख्यमंत्री करायचे आहे, जे भाजपने फेटाळून लावले. गुजरातसह हिमाचल प्रदेशमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भाजपमध्ये सामील होणे हा ‘आप’साठी मोठा धक्का मानला जात आहे. (Before the election, BJP gave a big blow to Kejriwal in this state)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: