फर्निचरचे काम करणाऱ्या दोन मित्रांना मारहाण; तिघांविरूध्द गुन्हा

0 142
A case has been registered against four persons from Kashti on the orders of the Commissioner of Police

 

अहमदनगर – फर्निचरचे काम करणाऱ्या दोन मित्रांना तिघांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास प्रेमदान चौकात घडली. या प्रकरणी तीन अनोळखी व्यक्तींविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणपत जगमालजी तांडा (वय २२ रा. भिस्तबाग चौक, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे.

 

फिर्यादी व त्यांचे मित्र अनिल गणपतराम ईनाणियाँ फर्निचरचे काम करतात. तीन अनोळखी व्यक्तीने त्यांना प्रेमदान चौकात बोलून घेतले. ते प्रेमदान चौकात अनोळखी गेले असता अनोळखी तिघे त्यांना म्हणाले, ‘आम्ही तुम्हाला फर्निचरचे काम देतो, गाडीत बसा’, असे म्हणाले असता त्यांना फिर्यादी व त्यांचा मित्राने नकार दिला.

 

Related Posts
1 of 2,107

याचा राग आल्याने तिघांनी फिर्यादी व त्यांच्या मित्राला शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यातील एका व्यक्तीने हातातील काहीतरी टणक वस्तूने अनिल याच्या डोक्यात मारून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस नाईक जावेद शेख करीत आहेत.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: