सावधान ! कोरोनाचा नवीन सुपर व्हेरिएंट डेल्टापेक्षाही अधिक धोकादायक 

0 320
नवी दिल्ली –  देशातील बहुतेक राज्यात कोरोना (Corona ) विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव  कमी झाला असला तरी बहुतेक राज्यात कोरोना विषाणूच्या नवीन नवीन  व्हेरिएंट ( variant) समोर येत आहे. यामुळेच अनेक रुग्णांना कोरोना विषाणूचा संक्रमण होत आहे. यातच आता कोरोना विषाणूचा आणखी एक नव्या ‘सुपर व्हेरिअंट’ चा प्रादुर्भाव येणाऱ्या काही दिवसात वाढणार असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. (Be careful! The new super variant of the Corona is even more dangerous than the Delta)
सध्याच्या डेल्टा व्हेरिएंट पेक्षाही हा व्हेरिएंट अधिक धोकादायक असून ज्यांचे अद्यापपर्यंत लसीकरण झालेले नाही, असे लोक याचे सुपर स्प्रेडर्स बनण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्याचबरोबर भारतात अद्यापही 12 वर्षाखालील मुलांचे लसीकरण न करण्यात आल्यामुळे येत्या काळात हा वयोगट कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटचा सुपर स्प्रेडर्स ठरु शकतो, अशीही भीती व्यक्त केली जात आहे.
या व्हेरिअंटबाबत संसर्गतज्ज्ञ प्रो. साई रेड्डी सांगतात की, सध्याच्या डेल्टा प्लस आणि इतर कोरोनाच्या इतर व्हेरिअंटपासून एक नवीन आणि अधिक धोकादायक व्हेरिअंट निर्माण होण्याची शक्यता असून देशात आणि जगभरात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंट चा मोठा प्रादुर्भाव झाला असल्यामुळे अनेक देशांतील परिस्थिती अत्यंत बिकट बनली होती. त्यातच आता नव्याने येत असलेल्या व्हेरिअंटचा प्रादुर्भाव हा त्यापेक्षाही अधिक धोकादायक असण्याची शक्यता असल्यामुळे येत्या काही वर्षात केवळ एकदाच कोरोनाची लस घेऊन उपयोग होणार नाही, तर अधिक लसी घ्याव्या लागतील.
Related Posts
1 of 1,499
या नवीन व्हेरिएंटची शक्ती एकापेक्षा अधिक लसीच कमी करु शकतील आणि त्याच्या प्रादुर्भावाविरोधात सक्षण लढा देऊ शकतील. कोरोनाच्या आगामी नविन व्हेरिअंटशी लढायचे असेल, तर आपल्याला केवळ एकाच लसीवर अवलंबून राहून चालणार नाही. एकापेक्षा अधिक लसी आणि त्याही पलिकडे जाऊन इतर उपाय देखील शोधावे लागतील.(Be careful! The new super variant of the Corona is even more dangerous than the Delta)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: