
प्रतिनिधी DNA मराठी टीम
मुंबई – देशात मागच्या काही महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची(Corona patients) संख्या कमी होताना दिसत होती. यामुळे देशात कोरोना काळात लागू असणाऱ्या अनेक निर्बंधांना हटवण्यात आले होते. मात्र आता पुन्हा एकदा चिंतेत वाढ होताना दिसत आहे. देशात पुन्हा एकदा कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात मागच्या चोवीस तासांत १ हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार मागच्या चोवीस तासांत कोरोनाचे १ हजार ०७ रुग्णांची नोंद झाली आहे. (Be careful! Corona is growing in the country once again; Record so many patients today)
तर दुसरीकडे मागच्या २४ तासांत ८१८ रुग्ण कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. बुधवारी देशात कोरोनाचे १,०८८ नवे रुग्ण आढळले होते. हा आकडा १२ एप्रिलच्या तुलनेत ३६.६ टक्क्यांनी जास्त होता. यापूर्वी मंगळवारी ७९६ रुग्ण दाखल झाले होते. बुधवारी २४ तासांत नोंद झालेल्या मृत्यूंची संख्याही वाढली होती. बुधवारी, दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट ०.२५% इतका होता, तर साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट ०.२४ टक्के इतका होता.
२४ तासांत १५ लाख लोकांचं लसीकरण
मागच्या २४ तासांत एकूण १५,०५,३३२ जणांचं कोरोना लसीकरण झालं आहे. तर देशात आतापर्यंत एकूण १,८६,०७,०६,४९९ जणांचं लसीकरण झालं आहे. गेल्या २४ तासांत ४,२९,३२३ कोरोना चाचण्या झाल्या आहेत. आतापर्यंत देशात ७९.४९ कोटी कोरोना चाचण्या झाल्या आहेत. (Be careful! Corona is growing in the country once again; Record so many patients today)