बुमराहच्या “त्या” वक्तव्यावरून बीसीसीआय नाराज ? जाणून घ्या प्रकरण

0 293

 नवी मुंबई –   टी -20 वर्ल्ड कप (T-20 World Cup) मध्ये भारताचा (India team) आव्हान संपुष्टात आल्यानंतर आता भारतीय संघाच्या कामगिरीवर अनेक प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय संघ सुपर १२ (Super 12) मध्ये  पाकिस्तान (Pakistan) आणि न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध मोठ्या फरकारने पराभूत झाल्यानंतर सध्या भारतीय संघावर चारही बाजूने टीका होत आहे . यातच बीसीसीआय (BCCI) भारतीय गोलंदाज  जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) वर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. (BCCI upset over Bumrah’s “that” statement? Learn the case)

न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या झालेल्या सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना जसप्रीत बुमराह याने खराब कामगिरीसाठी थकवा हे कारण असल्याचं सांगितलं होतं. ‘तुम्हाला अनेकदा ब्रेकची गरज असते. तुम्ही तुमच्या कुटुंबीयांना मिस करता. सतत सहा महिने क्रिकेट खेळण्याचा परिणाम मनावर कुठेतरी होतोच. अशी प्रतिक्रिया दिली होती. यावर बीसीसीआय ने आपली नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. 

बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं याबाबत मत व्यक्त केलं आहे. ‘बायो-बबलमुळे होणाऱ्या थकव्याचा विषय असेल तर कोणत्याही खेळाडूला आयपीएल स्पर्धेत खेळण्याची बळजबरी करण्यात आली नव्हती. विराट किंवा बुमराहला वर्ल्ड कप स्पर्धा जास्त महत्त्वाची वाटत असेल तर आयपीएल स्पर्धा खेळायला नको होती. बीसीसीआयनं त्यांना सर्व सुविधा दिल्या होते. त्यांचे कुटुंबीय देखील सोबत होतो. कोरोना काळामुळे सर्वजण कठीण परिस्थितीतून जात आहेत.
काय म्हणाला होता बुमराह 
खराब कामगिरीसाठी थकवा हे कारण असल्याचं सांगितलं होतं. ‘तुम्हाला अनेकदा ब्रेकची गरज असते. तुम्ही तुमच्या कुटुंबीयांना मिस करता. सतत सहा महिने क्रिकेट खेळण्याचा परिणाम मनावर कुठेतरी होतोच. अनेक गोष्टी तुमच्या नियंत्रणात नसतात. कोण, कधी, कुणाविरुद्ध खेळणार याचा कार्यक्रम तयार केला जातो. त्यामुळे बबलमध्ये राहणे आणि कुटुंबापासून इतका कालावधी दूर राहण्याचा परिणाम मनावर होतो. बीसीसीआयनं त्यांच्या बाजूनं बरेच प्रयत्न केले. पण बबलमध्ये सतत राहिल्याने खेळाडू मानसिकरित्या थकतात.’ असा दावा बुमराहने केला होता.  (BCCI upset over Bumrah’s “that” statement? Learn the case)
Related Posts
1 of 65
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: