
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की राज्याचा ऊर्जा विभाग हा काँग्रेसकडे आहे. जनतेचा रोष त्यांच्यावर निर्माण व्हावा यासाठी राज्य सरकारकडून ऊर्जा विभागाला पैसा दिला जात नाही. राज्य सरकारच्या अर्थ मंत्रालयाने ऊर्जा विभागाचा कॅश फ्लो बिघडवण्याचं काम केलं आहे.त्यामुळे रेल्वे, एनटिपीसी, डब्ल्यूसीएल, खासगी कंपन्या यांचं थकीत वाढलं आहे. त्यामुळे राज्य विजेच्या संकटाचा सामना करावा लागत आहे.
सध्या महाराष्ट्र राज्यासह देशातील तब्बल १० राज्यात वीज संकट उभा राहिला आहे. उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि तेलंगणामध्ये सध्या वीज संकट आहे. त्यामुळे या राज्यात देखील ग्राहकांना विजेच्या तात्पुरत्या भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे.