शासकीय अधिकाऱ्यांच्या नावांचा वापर करून केली बँकेची फसवणूक, गुन्हा दाखल

0 179
 पुणे –  सहकारनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत  शासकीय (Government ) अधिकाऱ्यांच्या चेक आणि सही शिक्क्यांचा दुरुपयोग करून बँकेची फसवणूक (fraud ) करणाऱ्या पाच आरोपीना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी  विश्वनाथ आनंद किरतावडे , सुदेश मधुकर आव्हाड , सागर प्रेमचंद पारख , श्रवण मल्लय्या तागलापोल्ली आणि विकास मुनलाल यादव या आरोपीना अटक केली आहे. आरोपींनी संगनमताने सातारा रस्त्यावरील नामांकित बँकेची फसवणूक केली, तर अधिक तपासात यवतमाळमधील एका बँकेतून २८ लाख रुपये काढल्याचे तपासात समोर आले आहे. (Bank fraud committed using names of government officials)
या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  शुक्रवारी दि. २२ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास  सातारा रस्त्यावरील एका बँकेत अगरतळा महापालिका आयुक्तांच्या नावाचा बनावट चेक वटवन्यासाठी एकजण येणार असल्याची माहिती सहकारनगर पोलीस ठाण्यातील अंमलदार सागर शिंदे आणि प्रदीप बेडीस्कर यांना मिळाली होती. त्यानुसार तपास पथकातील पोलीस आधिकारी सुधीर गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून किरतावडे याला ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याचे साथीदार आव्हाड आणि पारख यांनाही ताब्यात घेण्यात आले.
Related Posts
1 of 1,481

त्याचबरोबर आणखी दोन साथीदारांबाबत माहिती मिळाली असता त्यानुसार त्याच दिवशी सायंकाळी त्यांना ही डेक्कन येथून श्रवण आणि विकास  ताब्यात घेण्यात आले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी बनावट चेकद्वारे चंदिगढ येथील मुख्य लेखापाल यांच्या यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील खात्यातून २८ लाख रुपये काढल्याचे निष्पन्न झाले. याबाबत पोलिसांनी तपास केला असता श्रवण आणि विकास यांच्यावार चंदिगढ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात त्यांना आणखी कुणी मदत केली आहे का? याबाबत सहकारनगर पोलिस अधिक तपास करत आहेत.(Bank fraud committed using names of government officials)

हे पण पहा – येसवडी गावातील अनाधिकृत हातभट्टी आणि दारु विक्रीवर कारवाई व्हावी

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: