बंडातात्या कराडकर पुन्हा चर्चेत: महात्मा गांधीबद्दल वादग्रस्त विधान;नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

0 338
Bandatatya Karadkar under discussion again: Controversial statement about Mahatma Gandhi; New controversy is likely to break out

पुणे – नेहमी काहींना काही कारणाने चर्चेत असणारे बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्यांनी यावेळी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने पुन्हा एकदा त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे हुतात्मा गेले त्या शहीद दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानादरम्यान बंडातात्या बोलत असताना महात्मा गांधी यांच्या अहिंसावादामुळे नाहीतर क्रांतिकारकांमुळे स्वातंत्र्य मिळाले आहे. महात्मा गांधींचा अहिंसावाद आणि हिंदुत्व हे दोन्ही पक्षपाती आहेत, असे वादग्रस्त विधान बंडातात्या कराडकर यांनी केला आहे.

व्याख्यानादरम्यान बंडातात्या म्हणाले कि “भगतसिंग यांनी केलेली क्रांती अभूतपूर्व आहे. सुरुवातीला त्यांच्या मनामध्ये महात्मा गांधींची छाप होती. महात्मा गांधींच्या अहिंसावादी धोरणाची भगतसिंग यांच्या मनावर छाप होती. आपल्याला हे स्वातंत्र्य अहिंसक मार्गाने मिळवायच आहे, असं भगतसिंग यांना वाटायचे. पण, भगतसिंगाच्या भ्रमाचा भोपळा तीन वर्षांमध्ये फुटला,” असं बंडातात्या यांनी म्हटलंय. “१९२२ ला एक हत्याकांड झालं. त्या हत्याकांडात समर्थन देण्यासाठी म्हणून महात्मा गांधींनी नकार दिला. तेव्हा, भगतसिंग हे महात्मा गांधींवर नाराज झाले. महात्मा गांधींच्या अहिंसावाद आणि महात्मा गांधी यांचं हिंदुत्व हे दोन्ही पक्षपाती आहेत,” असं विधान बंडातात्या यांनी हे उदाहरण देत म्हटलंय.

“भगतसिंग यांच्या मनावर परिणाम झाला की या म्हाताऱ्याच्या (महात्मा गांधी) मार्गाने जाण्याचे कारण नाही. ते त्यानंतर क्रांतिकारक बनले. लोकमान्य टिळक यांचं एक वाक्य आहे, की म्हाताऱ्याच्या (महात्मा गांधी) पद्धतीने स्वराज्य मिळवायचं असेल ना भारत स्वातंत्र्य व्हायला एक हजार वर्षे लागतील. १९४७ ला जे स्वातंत्र्य मिळालं ते अहिंसेने मिळालेले नाही. १९४२ ला क्रांतिकारकांची चळवळ उभी राहिली, चले जाव चळवळ! या चळवळीमध्ये गावोगावी पोलीस स्थानके जाळणे, रेल्वे रूळ उखडणे, सरकारी कचेऱ्या जाळणं या घटना घडत गेल्या. त्याचा बोध इंग्रजांनी घेतला की, आता हा देश सोडण्याशिवाय पर्याय नाही,” असं बंडातात्या म्हणाले.

Related Posts
1 of 2,222

“साबरमती के संत तुने कर दिया कमाल… दे दी हमें आझादी खडक बिना ढाल… असं म्हटलं जातं. हे साडेतीनशे लोकांनी आहुत्या दिल्यात, त्यांच्या क्रांतीचा अपमान केल्यासारखं आहे,” असं म्हणत बंडातात्यांनी महात्मा गांधीच्या योगदानाबद्दल भाष्य केलंय.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: