DNA मराठी

अन् ‘तो’ प्रश्न विचारताच बाबा रामदेव संतापले: पत्रकाराला म्हणाले “गप्प बस ..; पाहा व्हिडिओ

0 430
Baba Ramdev got angry when he asked the 'that' question. Watch the video

प्रतिनिधी DNA मराठी टीम 

मुंबई –  पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या (Assembly elections) निकालांतर देशात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and diesel) दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागली आहे. मागच्या दहा दिवसात तब्बल नऊ वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्य जनतेच्या चिंतेत वाढ झाली आहे. आत पर्यंत पेट्रोल आणि डिझेल ६ रुपये ४० पैशांनी महागलं आहे. गुरुवारीदेखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलीटर ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे. यावरूनच एका पत्रकाराने योगगुरु रामदेव बाबा यांना प्रश्न विचारला हा प्रश्न ऐकताच रामदेव संतापल्याचं पहायला मिळालं.

हरियाणामधील कर्नल येथे आयोजित एका कार्यक्रमात रामदेव बाबांनी उपस्थिती लावली. यावेळी एका पत्रकाराने लोकांनी ४० रुपये प्रतिलीटर आणि स्वयंपाकाचा गॅस ३०० रुपये सुनिश्चित करू शकणार्‍या सरकारचा विचार केला पाहिजे असं म्हटलं होतं याची आठवण करुन देत प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना रामदेव बाबांचा पारा चढला. “हो मी तसं म्हणालो होतो, तुम्ही काय करु शकता? मला असे प्रश्न विचारत जाऊ नका. मी तुमचा कंत्राटदार आहे का जो सतत तुमच्या प्रश्नांना उत्तर देत बसणार?,” अशी विचारणा रामदेव बाबांनी केली.

पत्रकाराने पुन्हा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता रामदेव बाबा आणखी संतापले आणि त्याच्याकडे बोट दाखवत म्हणाले, “हो मी केलं होतं वक्तव्य, तू काय करणार आहेस? शांत राहा, परत विचारलंस तर तुझ्यासाठी हे चांगलं नसेल. अशा पद्दतीन बोलू नकोस, तू एका चांगल्या आई-वडिलांचा मुलगा असावास”

रामदेव बाबा यांनी यावेळी लोकांना कठीण वेळेत जास्त परीश्रम घ्या असा सल्ला दिला. “सरकार म्हणतं जर इंधनाचे दर कमी असतील तर त्यांना कर मिळणार नाही मग ते देश कसा चालवणार? पगार कसे देणार? रस्ते कसे बांधणार? महागाई कमी झाली पाहिजे याच्याशी मी सहमत आहे, पण लोकांनी जास्त मेहनत घेतली पाहिजे. मीदेखील पहाटे ४ वाजता उठतो आणि रात्री १० पर्यंत काम करत असतो,” असं रामदेव बाबांनी म्हणताच त्यांच्या शेजारी बसलेले समर्थक टाळ्या वाजवू लागले.

Related Posts
1 of 2,482

 

तर दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलीटर ८० पैशांची वाढ झाली आहे. गेल्या १० दिवसांत नवव्यांदा इंधनाचे दर वाढले आहेत. यामुळे फक्त गेल्या १० दिवसांत इंधन तब्बल ६ रुपये ४० पैशांनी महागलं आहे.

इंधनाचे दर वाढले असल्याने दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलीटर १०१ रुपये ८१ पैसे झाला आहे. याआधी हा दर १०१ रुपये १ पैसे होता. तर  डिझेलचा दर प्रतिलीटर ९२ रुपये ७ पैशांवर पोहोचला आहे. याआधी हा दर ९३ रुपये ७ पैसे होता. मुंबईत ८० पैशांची वाढ झाल्यानंतर एक लीटर पेट्रोल आणि डिझेलसाठी तब्बल ११६ रुपये ७२ पैसे आणि १०० रुपये ९४ पैसे मोजावे लागणार आहेत.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: