श्री नागेश विद्यालयाच्या प्राचार्यपदी बी के मडके

0 13

जामखेड –  रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालयाच्या प्राचार्यपदी बी के मडके यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल नागेश विद्यालय स्कूल कमिटी व कन्या विद्यालय स्कूल कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी नागेश विद्यालय स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य हरिभाऊ बेलेकर, विठ्ठलअण्णा राऊत, कन्या विद्यालयाचे स्कूल कमिटी सदस्य प्रा मधुकर आबा राळेभात, सुरेश भोसले, उद्योजक दिलीप बाफना, मुख्याध्यापिका सौ चौधरी के.डी, पर्यवेक्षक हरिभाऊ ढवळे,, दत्तात्रय ढाळे, संतोष ससाने, रमेश बोलभट, प्रा प्रकाश तांबे, दिलीप ढवळे, एनसीसी ऑफिसर मयूर भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

या जिल्यातील ८० महानगरपालिकाच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण 

यावेळी सर्व स्कूल कमिटीच्या सदस्यांनी सत्कार करून अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. प्राचार्य मडके यांनी विद्यालयाच्या विकासासाठी पूर्ण वेळ देणार आहे तसेच शिस्त स्वच्छता व अभ्यासात सातत्य   या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचा आहे, सर्व स्पर्धा परीक्षा, स्कॉलरशिप गुरुकुल यावर लक्ष केंद्रीत करून विद्यार्थ्यांचा विकास साधणार आहोत असे मनोगत व्यक्त केले.

Related Posts
1 of 1,301

शिधापत्रिकासाठी पुरवठा निरीक्षकाची पैश्याची मागणी, महिलांचा आत्मदहनाचा इशारा

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: