ऑटो रिक्षा आणि ट्रकचा भीषण अपघात…., 10 जणांचा मृत्यू

0 272

गुवाहाटी –  असाम (Assam) मधील करीमगंज (Karimganj) मध्ये एका ऑटो रिक्षा (Auto rickshaw) ची आणि सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रक (Truck) ची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातामध्ये १० जणांचा मुत्यू झाला (10 people were killed) आहे.   पहाटेच्या वेळी काहीजण छठ पूजा वरून परतत असताना हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका ऑटो रिक्षाची सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकला जोरदार धडक बसून हा अपघात झाला.(Auto rickshaw and truck crash kills 10)

चहाच्या बागेत काम करणाऱ्या लोकांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला असल्याचा अंदाज आहे. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 (National Highway No. 8) वर बैठाखल भागात गुरुवारी पहाटे घडली आहे.  हे ठिकाण असाम-त्रिपुरा सीमेवर असलेल्या करीमगंज जिल्ह्यातील पाथरकंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर सामूहिक बलात्कार अन् खुनाचा प्रयत्न

वाहनांच्या धडकेनंतर नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी सांगितले की, अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बहुतांश मुले आणि महिला आहेत. छठ पूजा आटोपून ते रिक्षातून घरी परतत होते. विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने ऑटो रिक्षाला धडक दिली. मृतांमध्ये तीन पुरुष, पाच महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. या अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून, त्याचा सध्या पोलिसांकडून शोध सुरू आहे. ट्रक चालक अतिशय वेगाने गाडी चालवत होता आणि त्यामुळेच विरुद्ध दिशेने येणाऱ्या ऑटो रिक्षाला धडकला, असे प्रत्यक्षदर्शींनी म्हणणे आहे.(Auto rickshaw and truck crash kills 10)

हे पण पहा –  फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग, पहा हा भीषण आगीचा व्हिडिओ

Related Posts
1 of 1,463
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: