
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यावरून टीका केली होती या टीकेला उत्तर देताना माजी खासदार खैरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर वरील आरोप केला आहे.
काय म्हणाले खैरे
फडणवीस हे स्वतः पाच वर्षे मुख्यमंत्री होते. संभाजीनगरचा मुद्दा घेऊन मी त्यांना वारंवार भेटलो, त्यांनी का नाही हे नामकरण केले? मुळात फडणवीस हे जनतेची दिशाभूल करतात. त्यांनी संभाजीनगरसाठी काहीही केलेले नाही, असा आरोप शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर केला आहे.
अहवाल केंद्र सरकारकडे पाठविला. त्याचाही पाठपुरावा केला. पण केंद्राने तेही केले नाही. केवळ टाळ्या मिळवण्यासाठी अशी वक्तव्य करू नये, असंही खैरे म्हणाले. मला बहिरे म्हणतात. अहो तुमचे नेतेच बहिरे झाले आहेत त्यांना पहा, असे म्हणत फडणवीस खोटे बोलत आहे, असेही चंद्रकांत खैरे म्हणाले.
1988 पासून औरंगाबादला आम्ही संभाजीनगर म्हणत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. मी सगळीकडे संभाजीनगर बोलतो. २ वर्ष कायदेशीर तयारी केली आहे. आम्ही दोन अडीच वर्ष काम करत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रिकामे बसले नाहीत. केंद्रांत आणि राज्यात भाजपाची सत्ता असून संभाजीनगर केले नाही, हा भाजपचा दोष आहे, असा आरोपही शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.