राज ठाकरेंच्या सभेपूर्वीच औरंगाबाद पोलिसांनी दिली मोठी अपडेट,म्हणाले..

0 438
Aurangabad police gave a big update before Raj Thackeray's meeting, said ..

औरंगाबाद –  सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेत असणारे मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंगे हटवण्याची भूमिका  घेतल्याने राज्यात राजकीय पारा चांगलाच तापला आहे. यातच आता पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे १ मे रोजी औरंगाबादमध्ये (Aurangabad) जाहीर सभा घेणार आहे. त्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी सुद्धा सुरू आहे.(Aurangabad police gave a big update before Raj Thackeray’s meeting, said ..)

तर दुसरीकडे या सभेला विरोध देखील सुरू झाला आहे. राज ठाकरे या सभेमध्ये पुन्हा एकदा शिदीवरील भोंग्यांबद्दल बोलणार असल्याचा अंदाज वर्तावला जात आहे.  यातच आता मात्र त्यापूर्वीच औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. प्रार्थना स्थळांवर भोंगे लावले असतील तर त्यांनी तातडीने परवानगी घ्यावी, नियम पाळावे अन्यथा कारवाई केली जाईल, असं औरंगाबाद पोलीस आयुक्त निखिल गुप्ता म्हणाले.

पोलीस आयुक्त गुप्ता यांनी माध्यमांना माहिती दिली. सोशल मीडियावर आमचं लक्ष आहे. काही चिथावणी खोर भाषा अथवा समाजात तेढ निर्माण होईल, असा मजकूर सोशल मिडियावर टाकणाऱ्यांवर आमचं लक्ष आहे. तसेच याबाबत नागरिकांनीही पोलिसांना माहिती द्यावी. आम्ही नक्कीच कारवाई करू, असे पोलीस आयुक्त म्हणाले.

Related Posts
1 of 2,357

भोंग्यांबाबत आणि सर्वच ध्वनीक्षेपकांबाबत सुप्रीम कोर्टाने नियम दिले आहेत. त्या नियमांचे आता पालन करावे लागेल. त्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रार्थना स्थळांवर भोंगे लावले असतील त्यांनी तातडीने परवानगी घ्यावी, नियम पाळावे अन्यथा कारवाई केली जाईल. यासाठी काही दिवसांची मुदत त्यांना दिली जाईल, असेही आयुक्त निखिल गुप्ता यांनी स्पष्ट केले. (Aurangabad police gave a big update before Raj Thackeray’s meeting, said ..)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: