गळफास लागलेल्या अवस्थेत अतुल दुतारे यांचा मृतदेह आढळला..

0 508
Atul Dutare's body was found strangled.

श्रीगोंदा :- श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील बहुचर्चित व्यक्तिमत्त्व सर्वांशी परिचित असलेले अतुल दूतारे (Atul Dutare) (वय 38 वर्षे) यांचा मृतदेह त्यांचे इंदिरानगर स्थित राहते घरी लोखंडी अँगलला बेडशीट गुंडाळून ती गळ्याला आवळलेल्या अवस्थेत आढळला आहे. ही दुर्दैवी घटना बुधवार पहाटे 4:00 वाजण्याच्या सुमारास घडली असल्याचे समजते आहे. स्थानिक रहिवाशांनी पोलीस प्रशासनाला दिलेल्या खबरीनंतर सदरील प्रकार निदर्शनास आला.

अतुल हा अतिशय मनमिळावू स्वभावाचा युवक होता. त्याचे सर्व स्तरातील लोकांशी मैत्रीचे संबंध होते. जशास तसा वागणे हा त्याचा स्वभाव गुण होता. मागील काही घटनांमुळे तो वादाच्या भोवर्‍यात आला होता. मात्र, प्रशासनाने केलेल्या कारवाईनंतर त्याने चांगल्या पद्धतीने आयुष्य व्यतीत करण्याचा निर्णय घेतला होता. आणि तो साधारण पद्धतीने आपले दैनंदिन जीवन चालवत होता. परंतु, आज घडलेल्या दुर्घटनेनंतर सर्वांनीच अतुल बाबत आश्चर्य व्यक्त केले आहे.

अतुलच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलं, भाऊ असा कुटुंब विस्तार आहे. त्याच्या अशा पद्धतीने जाण्याने परिसरासह मित्र परिवारा मध्ये दुःख व्यक्त केले जात आहे. घटनेनंतर नमूद प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासन करीत आहे.

Related Posts
1 of 2,326
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: