विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने लावली नगर शहरासह जिल्ह्यात हजेरी..

0 211
Attendance in the district including Nagar city due to unseasonal rain with thunder ..

अहमदनगर – हवामान खात्याने वर्तविलेला अंदाजानुसार शुक्रवारी रात्री विजांच्या कडकडाटासह अहमदनगर शहरासह जिल्हयातील पारनेर श्रीगोंद्यासह इतर तालुक्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली.अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील काही ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रात्री विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा सुरू होताच नगर शहरासह जिल्ह्यातील बहुसंख्य भागात अचानक वीज गायब झाली होती.

चार दिवस पावसाचे वातावरण राहील, असा इशारा हवामान विभागाने तीन दिवसांपूर्वीच दिला होता. त्यानुसार वातावरणातील उष्मा वाढला होता तसेच वातावरणात अचानक बदलही दिसून येत होता. मात्र, मागील दोन दिवसांत नगर शहरातील काही परिसरवगळता कुठेही फारसा पाऊस झाला नव्हता. बोल्हेगाव, एमआयडीसी परिसरात गुरुवारी सकाळी हलक्या सरी कोसळल्या होत्या.

Related Posts
1 of 2,446

शुक्रवारी सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवत होता. सायंकाळी चारच्या सुमारास पारनेर, श्रीगोंदा, नेवासा आदी तालुक्यांमध्ये काहीसे ढगाळ वातावरण झाले होते. त्यानंतर अचानक सोसाट्याचा वारा सुटला. विजांचा कडकडाटही सुरू झाला. वारा इतका वेगात होता की सर्वत्र धुळीचे साम्राज्य होते.तसेच नगर शहर परिसरातही रात्री नऊच्यानंतर जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकटात अवकाळी पाऊस झाला.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: