नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर सामूहिक बलात्कार अन् खुनाचा प्रयत्न

0 307

 नवी दिल्ली –   नोकरीच्या बहाण्याने आलेल्या तरुणीवर जबरदस्तीने दारू पाजून सामूहिक बलात्कार ( gang rape) केल्याची धक्कादायक घटना द्वारकेतल्या दक्षिण परिसरातून समोर आली आहे. या घटनेला पीडित तरुणीने विरोध केल्यास त्याला गळा दाबून तिचा खून करण्याचा प्रत्यन देखील आरोपींकडून करण्यात आला आहे. आरोपीने तिच्या तोंडावर लोखंडी रॉडने वार केले. घटनेनंतर आरोपी मुलीला जखमी अवस्थेत हॉटेलमध्ये सोडून पळून गेला.(Attempt of gang rape and murder of a young woman by showing job lure)

आपल्या सोबत घडलेला प्रकरणाचा माहिती पीडित तरुणीने कशी तरी स्थानिक पोलिसांपर्यंत पोहोचवली नंतर तिने लाईव्ह लोकेशन पोलिसांसोबत शेअर केले. यानंतर पोलीस जखमी मुलीपर्यंत पोहोचले. हॉटेलचा दरवाजा तोडून दुसऱ्या मजल्यावरून मुलीची सुटका करण्यात आली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. द्वारका दक्षिण पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापक संजय कुमार महतो याच्याविरुद्ध बलात्कार, सामूहिक बलात्कार, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, गुन्हेगारी कट रचणे आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करून अटक केलीय. पोलीस मुख्य आरोपी अंकित सेहरावतचा शोध घेत आहेत. हॉटेलमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरूनही पोलीस तपास करत आहेत.

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी ही द्वारका परिसरात कुटुंबासोबत राहते. ती सेल्स गर्ल म्हणून काम करते. ती चांगल्या नोकरीच्या शोधात होती. अलीकडेच अंकित सेहरावाल नावाच्या तरुणाशी तिची भेट झाली आणि पीडितेला चांगली नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले. शनिवारी संध्याकाळी आरोपीने तिला  करून तिला भेटण्यास सांगितले. दोघांची भेट बिकानेर स्वीट मध्ये झाली.

हे पण पहा –  फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग, पहा हा भीषण आगीचा व्हिडिओ

Related Posts
1 of 1,603

यानंतर रात्री 8.00 वाजण्याच्या सुमारास आरोपी ने पीडितेला त्याच्या दुचाकीवर बसवून सेक्टर-9 जवळील सिल्व्हर पॅलेस हॉटेलमध्ये नेले. तेथे पीडितेने हॉटेलमध्ये जाण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपी ने सांगितले की, सर्वजण त्याला हॉटेलमध्ये ओळखतात, त्याची आई स्वत: पोलीस अधिकारी आहे. तो नुकताच हॉटेलमध्ये नोकरीबद्दल बोलण्यासाठी आला आहे. आरोपी ने सपनाला दुसऱ्या मजल्यावर नेले. खोली क्रमांक-202 मध्ये पोहोचल्यावर आरोपीने पीडितेला जबरदस्तीने दारू पाजली. त्याला विरोध केला असता तिला बेदम मारहाण करण्यात आली. जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपीने तिच्यावर बलात्कार केला.पीडितेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने इतर लोकांच्या मदतीने तिचा गळा दाबण्याचा ही प्रयत्न केला. नंतर त्याने पीडित तरुणीवर वार करून रक्तबंबाळ केले. घटनेनंतर आरोपीने जीवे मारण्याची धमकी देऊन तिथून पळ काढला. (Attempt of gang rape and murder of a young woman by showing job lure)

आईसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशयावरुन , चुलत्याला गोळ्या झाडून केला ठार

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: