कुकडीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांची आत्महत्या करण्याचा प्रयत्न

0 194
Attempt by farmers to commit suicide for poultry water
प्रतिनिधी DNA मराठी टीम 
श्रीगोंदा  :- श्रीगोंदा तालुक्यात कुकडी कालव्याच्या आवर्तन सुरू असून १३२ लिंक कालव्याला पाणी सुरू असताना हे पाणी दोन मोरया जवळ सुरू असताना कुकडीच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी पाणी टेल ला नेण्यासाठी बंद प्रयत्न सुरू केले होते.(Attempt by farmers to commit suicide for poultry water)
Related Posts
1 of 2,208
त्यातच आनंदकर ,शेंडगे वस्ती परिसरातील शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले होते.१४ एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास शेतकऱ्यांनी पूर्ण क्षमतेने पाणी मिळावे यासाठी आंदोलन सुरू केले.यावेळी कुकडीच्या अधिकारी पाण्याच्या बाबतीत उत्तरे देताना चालढकल करत असल्याने शेतकरी आक्रमक झाले असताना एक शेतकऱ्यांने अचानक अंगावर डिझेल ओतून घेतले.
 यावेळी सुदैवाने उपस्थित असलेले पोलीस कर्मचारी समीर सय्यद यांनी प्रसंगावधान दाखवत शेतकऱ्याचे हातातील डिझेल ड्रम काढून घेतला .यावेळी पोलिसांच्या मध्यस्थी ने आंदोलन शांत झाले यावेळी समीर सय्यद वेळप्रसंगी नंतर पोलीस उपनिरीक्षक अभंग पोलीस कॉन्स्टेबल टाके, बोराडे इंगवले, कोतकर, मांडगे आदी उपस्थित होते. (Attempt by farmers to commit suicide for poultry water
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: