तीन मुलींवर आत्याचार…., आरोपीस 10 वर्षांचा कारावास ….

0 194
 लातूर –  विवाहित महिलेसोबत विवाहबाह्य संबंध ठेवत तिच्या तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी लातूरच्या विशेष सत्र न्यायालयाने आरोपीस दहा वर्षांचा कारावास आणि १ हजार २०० रुपये दंडाची शिक्षा विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश बी.सी. कांबळे यांनी सुनावली आहे.
लातूर शहरातील गांधी चौक पोलीस ठाण्यात १८ नोव्हेंबर २०१७ रोजी अल्पवयीन पीडित मुलीने तक्रार दाखल केली होती. तिची आई व तिच्या आत्याचा नवरा चंद्रकांत वागलगावे हे २००७ ते २०१७ असे एकूण दहा वर्षांपासून लग्न न करताच स्वखुशीने नवरा बायकोसारखे राहत होते. त्याचदरम्यान आरोपी चंद्रकांत याने पीडितेवर अत्याचार केला. ही बाब कोणाला सांगितल्यास सर्वांनाच जीवे मारीन अशी त्याने धमकी दिल्याने पीडिता गप्प राहिली.
Related Posts
1 of 1,481

त्यानंतर त्याला जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने पीडितेवर अत्याचार केला होता. काही दिवसांनी पीडितेच्या दोन लहान बहिणींसोबतही त्याने अत्याचार केल्याचे उघड झाल्याने पीडितेने गांधी चौक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर न्यायालयाने ८ साक्षीदार तपासले. यातील पीडितेची आई, दोन बहिणीची साक्ष, पीडित ही अल्पवयीन असल्याबाबतचा पुरावा साक्षी पुराव्यादरम्यान ग्राह्य धरून आरोपीस शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

10 वर्षापासुन दरोड्याचे गंभीर गुन्ह्यामध्ये फरार अंसलेले अट्टल दरोडेखोरास अटक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: