मात्र, नमूद प्रकार आंबेडकरी कार्यकर्त्यांसह काही पत्रकारांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत प्रशासनाला जाब विचारला.. तर, स्थानिक प्रशासनाने सदरील घटना आमच्या कार्यक्षेत्रात घडली नसल्याचे नमूद करत टोलवाटोलवी केली. उलट बौद्ध तरूणांवरच चोरीचा गुन्हा दाखल केला. मात्र, त्या तरुणांना जनावरांसारखी मारहाण करणाऱ्या मवाल्यांवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात आली. सदरील प्रकाराबाबत काही प्रसार माध्यमांनी आवाज उठवला. यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तालुकाध्यक्ष राजा जगताप, ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अमर घोडके, बहुजन समाज पक्षाचे जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ, NDMJ च्या प्रेरणाताई धेंडे इत्यादींनी सदर प्रकरणी पाठपुरावा केला. या विषयावर स्थानिक प्रशासनाला जाब विचारला. तसेच, ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांनी तर थेट घटनेचे कार्यक्षेत्र नाकारणाऱ्या पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना तात्काळ निलंबित करा अशी मागणी केली. त्यानंतर स्थानिक प्रशासन खडबडून जागे झाले. तसेच, प्रशासकीय हालचालीस सुरुवात करत आम्ही ॲट्रॉसिटी (Atrocities)नुसार गुन्हा दाखल करण्यास तयार आहोत. असे दुधाळ यांनी कबूल केले.
स्थानिक प्रशासनाची बेबंदशाही आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्याने प्रशासन तुरंत ताळ्यावर आले आहे. स्थानिक प्रशासन नमूद प्रकरणात एक पारखी भूमिका घेऊन, पीडितांच्या विरोधात कारवाई करत होते. मात्र, वेळीच पीडितांच्या वतीने आंबेडकरी चळवळ व कार्यकर्ते उभे राहिल्याने या प्रकरणात तालुक्यातील आंबेडकरी चळवळीची ताकद दिसून आली आहे.या नुसार काल दिनांक 16 एप्रिल 2022 रोजी अभिमन्यू साळवे याने दिलेल्या फिर्यादीनंतर संजय शेळके, आकाश मोरे, पांडुरंग देवरे, गोविंद सावंत, विकास थोरात, साहेबराव गवळी, आनंद जगताप, विष्णू गर्दुळकर सर्व राहणार बेलवंडी स्टेशन, कन्स्ट्रक्शन ऑफिस शंकर अर्थमूव्हर्स, प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नमूद गुंड प्रवृत्तीच्या लोकांविरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अर्थात ॲट्रॉसिटीचे कलम 3(1) (r), 3(1) (s) तसेच, भादवि कलम 323, 504, 506, 143, 147, 148, 149, 324 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.