
नगर : लग्न घटीकाजवळ आली होती… शुभमंगल सावधान होणार तोच पोलिस मिरवणुकीत दाखल झाले. त्यांनी नवरदेवाला ताब्यात घेत पोलिस ठाणे गाठले. वऱ्हाडी मंडळी मंगल कार्यालयात नवरदेव येण्याची वाट बघत होते तर लग्न लावण्यासाठी गुरु येऊन थांबले होते. परंतु बोहल्यावर चढण्याऐवजी नवरदेवाला पोलिस स्टेशनची पायरी चढण्याची वेळ आली.
त्याचे असे झाले ः नाशिक येथील एका महिलेने आमचे प्रेम संबंध असून लग्नाचे आमिष दाखवून नवरदेवाने अनेकदा अत्याचार केला असून माझी फसवणूक केली असल्याची तक्रार राहाता पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी मिरवणुकीतून नवरदेवाला ताब्यात घेतले. नाशिक येथे राहणारा व राहाता येथील नववधूशी लग्न लावण्यासाठी आलेल्या नवरदेवाविरुद्ध नाशिकच्या उच्चशिक्षित 26 वर्षीय महिलेने तक्रार दिली. तक्रारी पूर्वी कलवरे कलवऱ्यांच्या गराड्यात असणारा नवरदेव मात्र पोलिस स्टेशनला एकटाच दिसत होता.
हौदात पडून एका तरूणाचा मृत्यू
नवरदेवाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची वार्ता मंगल कार्यालयात पसरतात वऱ्हाडी मंडळींमध्ये पसरताच एकच कुजबूज सुरु झाली. विवाह स्थळी काही अनर्थ नको म्हणून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली. त्याचवेळी मात्र नवरदेवाकडून आलेल्या वऱ्हाडी मंडळीतील पाहुण्यांनी नको झंझट म्हणून मंगल कार्यालयातून काढता पाय घेत तेथून निघून जाणे पसंत केले.
याबाबतची सत्य घटना नववधू सह तिचे पालक व नातेवाईकांना समजताच लग्न मोडले गेले. नाशिक रोडच्या या नवरदेवाच्या बाबतीतील नाशिक प्रकरण समजल्यानंतर बरं झाले या नववधूचे या वरा सोबत लग्न झाले नाही तसेच लग्न मोडले ते बरे झाले अशीच चर्चा होती. चांगल्या मुलीच्या नशिबी असं का ? व्हावं तसेच या नववधूच्या लग्नाचं आता काय ? होईल तिचे आयुष्य व भविष्य काय व कसे ? राहिल याची चिंता वऱ्हाडी मंडळी नातेवाईक आप्तेष्ट व उपस्थित सर्वजण करीत होते तर दुसरीकडे सर्वजण तिच्या भावी आयुष्यासाठी व चांगल्या भवितव्यासाठी चांगला वर मिळो अशी प्रार्थना परमेश्वराकडे करीत होते. दरम्यान अध्यात्मिक संस्कार व उच्चशिक्षित अन सुसंस्कृत असलेल्या या नववधूसाठी नातेवाईकांनी नात्यातीलच वर शोधला शोधलेला नवरदेव मोठ्या मनाने पुढे आला. उपस्थित वराडी मंडळींच्या साक्षीने अक्षदारूपी आशीर्वादाने त्याच दिवशी काही तासातच या नववधूचे लग्न दुसऱ्या नवरदेवा सोबत लावून दिले.