ससून रुग्णालयात महिलेने नर्सचा ड्रेस घालून पळवलं चिमुकलीला, आरोपीला अटक

0 190

 पुणे –  पुणे शहरातील ससून रुग्णालयामध्ये एक महिलेने नर्सच्या वेषात येऊन तीन महिन्याच्या बाळाला पळवल्याची धक्कादायक घटना उघडीस आली आहे.  बाळ गायब झाल्याची माहिती समोर येताच  पोलिसांनी  तातडीने तपासाचे चक्र फिरवत आरोपी महिलेला आणि त्याच्या पतीला अटक केली आहे. तसेच बाळाला आईच्या हवाली करण्यात आलं आहे. (At Sassoon Hospital, a woman wearing a nurse’s dress fled to baby girl, the accused was arrested)

या प्रकरणाबद्दल मिळालेली अधिक माहिती अशी कि  एका 26 वर्षीय महिलेने आपल्या पतीसोबत नर्सचा वेषातर करून ससून रुग्णालयात दाखल झाली आणि  याठिकाणी  संधी साधून एका तीन महिन्याच्या मुलीला वॉर्डातून पळवलं . आपलं बाळ गायब असल्याचं पाहून बाळाच्या आईनं रुग्णालयातच हंबरडा फोडला होता. रुग्णालय प्रशासनाला याची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला होता. त्वरित पोलिसांना याची माहिती दिल्यामुळे नर्सच्या वेशात आलेल्या आरोपी महिलेला आणि तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे.तसेच पोलिसांनी बाळाची आरोपींच्या तावडीतून सुटका केली असून तिला सुखरूप आईच्या ताब्यात दिलं आहे.
Related Posts
1 of 1,486
संबंधित चोरट्या दाम्पत्याला मूलबाळ होतं नसल्याने त्यांनी तीन महिन्यांचं बाळ पळवल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेसह तिच्या पतीला अटक केली असून घटनेचा पुढील तपास सुरु आहे . (At Sassoon Hospital, a woman wearing a nurse’s dress fled to baby girl, the accused was arrested)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: