Asia Cup 2022 : टीम इंडिया खेळणार का आशिया कपचा अंतिम सामना?; समजून घ्या फायनलचे संपूर्ण समीकरण

0 46

 

Asia Cup 2022 : भारतीय क्रिकेट (Team India) संघ गुरुवारी आशिया चषकातील (Aisa Cup 2022) शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानशी (Afganistan) भिडणार आहे. हा सुपर-4 सामना केवळ औपचारिकता आहे कारण काल ​​पाकिस्तानने (Pakistan) अफगाणिस्तानवर विजय मिळवल्यानंतर अंतिम फेरीत पोहोचणारे दोन संघ निश्चित झाले आहेत. आशिया कप 2022 चा अंतिम सामना श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तान आणि टीम इंडिया आशिया चषकातून बाहेर पडल्या आहेत.

 

टीम इंडियाच्या आशा संपल्या आहेत
पाकिस्तानच्या या विजयाने अफगाणिस्तानसह भारतीय संघाच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. पाकिस्तानने विजयासाठी दिलेले 130 धावांचे लक्ष्य 19.2 षटकांत नऊ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. नाणेफेक हारल्यानंतर अफगाणिस्तान संघाने 20 षटकांत 6 बाद 129 धावा केल्या आणि पाकिस्तान संघाला विजयासाठी 130 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने 19.2 षटकांत 9 गडी गमावून 131 धावा केल्या आणि सामना जिंकला.

 

Related Posts
1 of 2,237

दोन्ही संघांमध्ये 2 गुणांसाठी लढत
आता कोणत्याही परिस्थितीत अफगाणिस्तान आणि भारताचा संघ अंतिम फेरीत पोहोचू शकणार नाही. अशा स्थितीत या दोन संघांमधील ही लढत केवळ 2 गुणांसाठी आहे. हा सामना जो संघ जिंकेल त्याला दोन गुण मिळतील आणि तो संघ सुपर-4 गटात तिसऱ्या क्रमांकावर असेल. जेतेपदाचा दावेदार मानला जाणारा भारतीय संघ आता तिसर्‍या क्रमांकासाठीही झुंज देत आहे. असे असले तरी दोन्ही संघातून कोण बाजी मारतो हे पाहणे आज विशेष ठरणार आहे.

 

पाकिस्तान आणि श्रीलंकेने दणका दिला
अफगाणिस्तान आणि भारत या दोन्ही संघांना सुपर 4 मध्ये श्रीलंका आणि पाकिस्तानने पराभूत केले होते. सुपर-4 च्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानचा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर टीम इंडियाचा पुढचा सामना श्रीलंकेकडून हरला. त्याचवेळी अफगाणिस्तानलाही पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: