MMS व्हायरल होताच ‘त्या’ अभिनेत्रीने केला मोठा खुलासा; म्हणाली, व्हिडीओत ..

मुंबई – मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर भोजपुरी गायिका शिल्पी राज (Shilpi Raj) याचा MMS व्हायरल होत आहे. त्यानंतर शिल्पीने सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल करू नका असं आवाहन देखील चाहत्यांना केला होता. या व्हिडिओ नंतर ती चांगलीच चर्चेत आली आहे. यातच आता तिने टाइम्स ऑफ इंडियाला एक मुलखात दिली आहे ज्यामध्ये तिने अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.
‘जेव्हा MMS स्कँडल पहिल्यांदा सोशल मीडियावर दिसलं, तेव्हा तू कुठे होतीस आणि तुझ्या फोनमधून हा MMS कोणी व्हायरल केला?’, असं विचारलं असता शिल्पी म्हणाली, ‘प्रामाणिकपणे सांगतेय, मी MMS पाहिलेला नाही. माझ्या नावाचा वापर करून हा एमएमएस सोशल मीडियावर (Social Media) टाकण्यात आला होता. एमएमएसमधील मुलगी कोण आहे, हे मला माहीत नाही. या व्हिडीओत दिसणारी मुलगी मी नाही. कोणी तरी मला बदनाम करण्यासाठी हा कट रचलाय,’ असा आरोपही शिल्पीने केलाय.
यामागे कोण असू शकतं, तुला कोणावर संशय आहे का?,’ यावर शिल्पी सांगते, ‘नाही, हे कोणी केलंय, याबद्दल मला तरी अजून माहिती नाही. असंही इंडस्ट्रीमध्ये जेव्हा कोणी प्रगती करत असतं, तेव्हा लोक बरं-वाईट बोलत असतात. महिलांचा कोणीही आदर करत नाही.’
याबद्दल तू पोलिसांकडे का तक्रार करत नाहीस?, असं विचारल्यावर कोर्टात केस सुरू असल्याचं तिने सांगितलं. ‘आम्ही कोर्टात केस दाखल केली आहे. प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्याशिवाय किंवा त्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्याशिवाय कोणत्याही व्हिडिओवर कोणाचंही नाव लावणं चुकीचं आहे. दरम्यान, हे प्रकरण घडल्यानंतर मी कोणत्याही मीडियाला दिलेली ही पहिलीच मुलाखत आहे. तुला इंडस्ट्रीमधून कोणाचे फोन आले नाहीत का, असं विचारलं असता शिल्पीने नकार दिला. अजिबात नाही. मला इंडस्ट्रीमधून आलेले सर्व कॉल माझे मॅनेजर अभय पांडे यांच्याकडे जातात.’
या प्रकरणानंतर पालकांच्या प्रतिक्रियेबद्दल विचारलं असता शिल्पी सांगते, ‘हे घडल्यानंतर माझा भाऊ चिंतेत होता आणि त्याने काळजीपोटी मला कॉल केला; पण मी त्याला सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या.’
कोण आहे शिल्पी राज?
शिल्पी राज ही मूळची उत्तर प्रदेशमधील देवरिया जिल्ह्यातील आहे. 2017 मध्ये “भुकुर भुकुर लाइट बरम करेजौ…” हे गाणं व्हायरल झाल्यानंतर शिल्पी लोकप्रिय झाली. तिने पवन सिंग, खेसारी लाल यादव, अरविंद अकेला यांसारख्या स्टार्ससोबत काम केलं आहे. अलीकडेच तिचा एमएमएस व्हायरल झाल्यानं ती चर्चेत आली होती.