भाजपला हे लक्षात आल्यानेच …… ,  शरद पवार यांचा भाजपावर गंभीर आरोप

0 1,593

नवी मुंबई –  २०१९ नंतर राज्यात सत्तेत असणारी महाविकास आघाडी (MVA) सरकारला अस्थिर करण्याचे करण्याचे काम भाजप (BJP) कडून होत असून शिवसेना (Shiv Sena) , राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress)चे नेते आणि त्यांच्या निकटवर्तीयांना केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून भीती दाखविली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार  (Sharad Pawar) यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.  (As soon as BJP realized this ……, Sharad Pawar made serious allegations against BJP)

मुंबई मध्ये खासदार शरद पवार पत्रकारांशी बोलताना महाविकास आघाडीचे सरकार पाडू शकत नाही. उलट हे सरकार पाच वर्षे टिकणार हे लक्षात आल्यानेच अंमलबजावणी संचालनालय (ईडी), केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय), प्राप्तीकर विभागाचा गैरवापर करून सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांच्या विरोधात चौकशीचा ससेमिरा मागे लावण्यात आला असल्याचा आरोप देखील यावेळी त्यांनी केला .

तर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते असा विधान केला होता या विधानाला उत्तर देत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत पाच वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविल्यावरही त्यांना विस्मरण होत नसावे. ही चांगली गोष्ट आहे. मी राज्याचे चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषविले, पण मला कधी त्याची आठवण होत नाही. अशी टीका त्यांनी केली आहे .

हे पण पहा –  जमीर इनामदार यांचे हृदय विकराच्या झटक्याने निधन | देशसेवेत कार्यरत असताना निधन

Related Posts
1 of 1,654

समीर वानखेडे वादग्रस्त

केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्याबद्दल बरेच काही ऐकायला मिळाले.  ते पूर्वी सीमाशुल्क विभागात होते तेव्हा त्यांच्या कारकिर्दीबद्दल बऱ्याच सुरस कथा कळल्या, असेही पवार म्हणाले.अंमली पदार्थाच्या विरोधात मुंबई पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांनी के लेल्या कारवाईची तुलना केल्यास मुंबई पोलिसांची कामगिरी अधिक सरस आहे. केंद्रीय यंत्रणांची प्रसिद्धच जास्त दिसते असा टोला पवार यांनी लगावला.(As soon as BJP realized this ……, Sharad Pawar made serious allegations against BJP)

पोलिसांच्या वर्दीला दाग, पोलीस ठाण्यात महिलेला पगार देण्याच्या बहाण्यानं बोलवलं अन्..

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: