मोबाइलवर कोण आहे याचा उत्तर वहिनीने न दिल्याने दीराने उचलले टोकाचे पाऊल

0 426

जबलपूर-   मध्य प्रदेशातील जबलपूर (Jabalpur) शहरात एका विवाहित महिलेची हत्या करण्यात आली आहे.  दीराने आपल्याच वहिनीची निर्घृण हत्या केली आहे.  या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. वाहिनी मोबाइलवर कोणाशी बोलत आहे याचा उत्तर वाहिनेने न दिल्याने आरोपी दिराने  रागातून धारदार शस्त्राने तिचा गळा चिरून हत्या केली.  हत्येनंतर आरोपी स्वतःच पोलीस ठाण्यात शस्त्र घेऊन हजर झाला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली.(As sister in law did not answer who is on the mobile, brother in law took the last step)

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार  जबलपूरमधील भंतलिया मोहल्ल्यात राहणारा आरोपी राजा चक्रवर्ती हा स्वतःच पोलीस ठाण्यात हजर झाला, त्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आल्याचे हनुमंतल पोलिसांनी सांगितले. राजाने आपल्या भावाच्या पत्नीची गळा चिरून हत्या केली. ती मोबाइलवर कुणाशी तरी बोलत होती. ती कुणासोबत बोलतेय, त्या व्यक्तीचे नाव सांगण्यास तिने नकार दिला. याचा राग आल्याने राजाने तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला.
Related Posts
1 of 1,487
या घटनेनंतर पोलीस आरोपीच्या घरी पोहोचले. महिला जमिनीवर पडली होती. तिच्या गळ्यावर जखमा होत्या. घटना घडली त्यावेळी तिचा पती, मुले आणि इतर कुटुंबातील सदस्य घरी नव्हते, असे सांगितले जाते. या घटनेचा तपास करण्यात येत आहे. आरोपीची चौकशीही करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.(As sister in law did not answer who is on the mobile, brother in law took the last step)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: