भारताचा नवा कर्णधार म्हणून द्रविडने दिली ‘या’ खेळाडूला पहिली पसंती

0 1,865
 नवी मुंबई –    सध्या सुरू असलेल्या टी – २० वर्ल्ड कप (T- 20 World Cup) नंतर  विराट कोहली (Virat Kohli) टी – २० मधून कर्णधारपद सोडणार आहे. त्याच्या जागी बीसीसीआय (BCCI) लवकरच  भारतीय संघासाठी नवीन कर्णधाराची निवड करणार आहे . नुकताच भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक (Head coach)  म्हणून निवड झालेल्या राहुल द्रविड (Rahul Dravid) ने भारतीय कर्णधार पदासाठी काही नाव बीसीसीआय ला सुचविले आहे. या नावांमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि  के. एल. राहुल (K. L. Rahul) यांच्या नावाचा समावेश आहे. राहुलने कर्णधार पदासाठी आपली पहिली पसंती रोहित शर्माला दिली असल्याची माहिती काही मीडिया रिपोर्ट्स नुसार बाहेर आली आहे.  (As India’s new captain, Dravid gave ‘this’ the first preference)
रिपोर्ट्सनुसार जर भारतीय संघ सध्या सुरु असलेल्या टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनल (Semifinals) मध्ये पोहोचू शकली नाही तर कोहली कडून एक दिवसीय फॉरमॅटचेही कर्णधारपद काढून घेतले जाऊ शकते. बीसीसीआयने अद्याप कोहलीचा उत्तराधिकारी निवडलेला नाही. अनेक क्रिकेट तज्ञांनी रोहित शर्मा, तर काहींनी केएल राहुल यांची नावे कर्णधारपदासाठी सुचवली आहेत.
Related Posts
1 of 58
मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने एका मुलाखतीत रोहितला टी-२० आंतरराष्ट्रीय कर्णधारपदासाठी आपली पहिली पसंती असल्याचे सांगितले. रोहितनंतर त्याने केएल राहुलचे नाव घेतले. रोहित शर्माने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये एक यशस्वी कर्णधार म्हणून आपली क्षमता सिद्ध केली, जिथे त्याने मुंबई इंडियन्सला विक्रमी पाच विजेतेपदे मिळवून दिली.  (As India’s new captain, Dravid gave ‘this’ the first preference)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: