Arrrr .. the havoc of stormy rain; 25 killed Arrrr .. the havoc of stormy rain; 25 killed
 
पाटणा –  देशातील बहुतेक भागात सध्या वादळी पावसाने (torrential rain) हाहाकार माजला आहे. अनेक ठिकाणी मोठ नुकसान पहिला मिळत आहे. मागच्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या या वादळी पाऊसामुळे बिहार (Bihar) राज्यात देखील मोठं नुकसान झाले आहे. बिहारच्या अनेक भागात काल गुरुवारी रात्री 25 ते 60 किमी प्रतितास वेगाने वादळ आलं आणि त्यानंतर काही वेळाने जोरदार पाऊस झाला. या वादळी पाऊसामुळे 25 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या हवामान विभागाने बिहार राज्यला यलो अलर्टचा इशारा दिला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये मुझफ्फरपूरमधील पाच, भागलपूरमधील चार, लखीसराय-सारणमधील प्रत्येकी तीन, मुंगेरमधील दोन आणि जमुई, बांका, बेगुसराय, खगडिया, पूर्णिया, नालंदा, जेहानाबाद आणि अररिया येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. यावेळी अनेक ठिकाणी कच्चा घरे आणि झाडे उन्मळून पडली. त्यामुळे वाहतुकीसह वीजपुरवठ्यावर परिणाम झाला.

 

 

वादळामुळे आंबा, लिची, मका, मूग, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. त्याचवेळी पाटण्यातील मणेर येथे वाळू वाहून नेणाऱ्या सहा बोटी गंगेत बुडाल्या. सुमारे 50 मजुरांनी पोहून त्यांचे प्राण वाचवले.

 

 

मान्सूनपूर्व उपक्रम आता सक्रिय

हवामानशास्त्रज्ञ आशिष कुमार यांच्या मते, वातावरणातील आर्द्रता-समृद्ध हवेचा प्रवाह, तापमानात झालेली वाढ आणि मध्य बिहारमधून ट्रफ लाइन गेल्यामुळे वादळ आणि पाऊस झाला आहे. राज्यात आता मान्सूनपूर्व हालचाली सक्रिय झाल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पूर्वेकडील प्रवाहामुळे वातावरणातील खालच्या पातळीवर आर्द्रतेच्या प्रमाणात वाढ नोंदविण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *