” तो ” हत्याकांड संतप्त प्रियकराकडूनच… , आरोपीला अटक

0 306
लखनऊ –  11 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेश मधील फतेहपुर जिल्ह्यात (Fatehpur District) झालेल्या मोहित तिवारी हत्याकांडाचा (Mohit Tiwari murder) तपास करत असताना या प्रकरणात पोलिसांच्या हाती एक धक्कादायक माहिती हाती लागली आहे. या प्रकरणात संतप्त प्रियकराने (Boyfriend) त्याच्या मित्रासह मोहित तिवारीचा कुऱ्हाडीने गळा चिरुन हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कल्लू पासवान आणि त्याचा साथीदार अनिल यादव यांना अटक केली.  ( arrested the accused, from the murder angry boyfriend)
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार  11 ऑक्टोबर रोजी सकाळी फतेहपूर जिल्ह्यातील किशनपूर पोलीस ठाण्याच्या परिसरातील रारी गावाच्या जंगलात एका   युवकाचा मृतदेह आढळला होता. धारदार शस्त्राने गळा कापून तरुणाचा खून करण्यात आला होता. तपासादरम्यान हा मृतदेह त्याच गावातील गोलू उर्फ ​​मोहित तिवारी याचा असल्याचं समोर आलं होते
Related Posts
1 of 1,481

मुख्य आरोपी कल्लू याने पोलिसांना सांगितले की, तो गावातील एका मुलीवर प्रेम करत होता आणि त्याला पळून जाऊन तिच्याशी लग्न करायचे होते. त्याच वेळी ती मुलगी मोहितच्या संपर्कात आली आणि मोहितने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवले. त्यामुळे ती मुलगी माझ्यापासून अंतर राखून राहत होती. मुलीवरुन माझे मोहितशी खटके उडू लागले, तेव्हा ही गोष्ट गावात चर्चेचा विषय झाली. या चर्चांच्या भीतीमुळे मुलीने आत्महत्या केली.

शिवसेना किंवा काँग्रेस सोडली नसती तर आज मुख्यमंत्री नक्कीच झालो असतो – भुजबळ

कल्लूने सांगितले की, मी मोहितचा मित्र अनिल यादव याला बोलावून सूड भावनेने मोहितची हत्या करण्याचा कट रचला. गावाबाहेर दारु पिण्याच्या बहाण्याने बोलावून मोहितची कुऱ्हाडीने गळा कापून त्याचा खून केला. पोलिसांनी खुनामध्ये वापरलेली कुऱ्हाड आणि मृत मोहित तिवारीचा मोबाईलही जप्त केला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.( arrested the accused, from the murder angry boyfriend)

 हे  पण पहा –    शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या… | आ. मोनिका

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: