म्हैस व एक पारडी चोरी करणारा सराईत गुन्हेगार मुद्देमालासह जेरबंद

0 162

अहमदनगर –   स्थानिक गुन्हे शाखे (Local Crime Branch) ने कारवाई करत श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यमधील खैरी निमगांव (Khairi Nimgaon) येथून दोन म्हैस ( buffalo) आणि एक पारडी (pardi) चोरी करणाऱ्या  सराईत गुन्हेगाराला मुद्देमालासह अटक केली आहे. या कारवाईत   ६० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रावसाहेब भाऊसाहेब कालंगडे, (वय-४० वर्षे, रा. खैरी निमगांव, ता. श्रीरामपूर) हे नेहमी प्रमाणे घरा शेजारी मोकळ्या गायरानामध्ये दोन म्हैस व एक पारडी चरण्यासाठी सोडुन सायंकाळी पाच वाजेचे सुमारास घरी घेवुन जात असे. १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास  रावसाहेब यांनी दोन म्हैस व एक पारडी गायरानामध्ये चरण्यासाठी सोडल्या होत्या.  सायंकाळी ०५.च्या  सुमारास रावसाहेब म्हैस व पारडी घरी घेवून जाणे करीता गायरानामध्ये गेले असता त्यांना आपले दोन म्हैस व एक पारडी दिसुन आल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी आजबाजुस व शेजारील वस्तीवर शोध घेतला आसता त्यांना दोन ते मिळुन आले नाही त्यामुळे त्यांनी ६० हजार रु. किंमतीच्य दोन म्हैस व एक पारडी कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्या असल्याची तक्रार श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन दाखल केली.
या तक्रारीनंतर पोनि अनिल कटके यांनी सदर गुन्ह्याचे तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक नेमले. पथकातील अधिकारी व अंमलदार हे सदर गुन्ह्याचा समांतर तपास करुन आरोपींची माहिती घेत असताना पोनि. अनिल कटके यांना गुप्त खबऱ्याकडून खात्रीशीर माहिती मिळाली कि, सदरचा गुन्हा हा संतोष चव्हाण, (रा. रांजणी, ता. शेवगांव ) याने केला असुन गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या दोन म्हैस व एक पारडी या आरोपीचे राहते घरी चव्हाण वस्तीवर बांधून ठेवल्या असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकातील सपोनि/सोमनाथ दिवटे, पोहेकॉ/मनोज गोसावी, पोना/संतोष लोढे, दिपक शिंदे, शंकर चौधरी, पोकॉ/रविंद्र घुंगासे, रणजीत जाधव, शिवाजी ढाकणे, सागर ससाणे, जालिंदर माने, चापोहेकॉ/ उमाकांत गावडे अशांनी मिळून आरोपीचे ठावठिकाणा बाबत गोपनिय माहिती घेवून सापळा लावून आरोपी  संतोष आश्रु चव्हाण, (रा. रांजणी, ता. शेवगांव) (फरार) यास ताब्यात घेणेसाठी गेले असता नमुद आरोपीस पथकाची चाहुल लागताच तो पळून गेला आहे.
नमुद गुन्ह्यात चोरीस गेलेल्या ६० हजार रु. किंमतीच्या दोन म्हैस व एक पारडी या आरोपींच्या घरी चव्हाणवस्ती, रांजणी, ता. शेवगांव येथे मिळून आल्याने त्यांची फिर्यादी यांचेकडुन ओळख पटवुन, ताब्यात घेवुन मुद्देमाल श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आला आहे. पुढील कारवाई श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे. सदरची कारवाई बी. जी. शेखर पाटील मा. विशेष पोलीस उपमहानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, मनोज पाटील पोलीस अधीक्षक अहमदनगर, दिपाली काळे अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व संदीप मिटके उपविभागीय पोलीस अधीकारी, श्रीरामपूर विभाग, अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
Related Posts
1 of 1,481
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: