बस चालकास मारहाण करणाऱ्या आरोपीला अटक; भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई

0 211
After giving information about the love affair to the lover's brother, the lover gave 'this' terrible punishment

 

अहमदनगर –  शेवगाव-नगर (Shevgaon-nagar) या एस टी बसमध्ये (ST bus) चढून एसटी बस चालकास मारहाण करणाऱ्या दोन आरोपी पैकी एका आरोपीला भिंगार कॅम्प (Bhingar Camp) पोलिसांनी कारवाई करत अटक केली आहे.   प्रज्योत उर्फ शिवम लोनिया (वय 35 राहणार ब्राह्मण गल्ली भिंगार)  असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.   सध्या आरोपी न्यायालयीन कोठडी मध्ये आहे तर या प्रकरणात असणारा दुसरा आरोपी फरार असून भिंगार पोलीस त्याचा शोध घेत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश गोरक्षनाथ शेळके यांनी या प्रकरणात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ते एस टी ड्रायव्हर असून माळीवाडा बस स्थानकातून एस टी नंबर एम एच 40 एन 8750 बस शेवगाव येथे जाण्यासाठी भिंगार कॅम्प पोलिसांच्या हाद्दीमधून जात असताना   नगर पाथर्डी रोडवर भिंगार येथे समाधान हटेलजवळ   मोटार सायकल  एम एच 16 सी एन 4771वर दोघेजण आले  व त्यांनी त्यांची मोटार सायकल एस टी बसला आडवी लावली आणि फिर्यादीला शिवीगाळ करून एस टी बस मध्ये चढून लाथाबुक्यांनी मारहाण केली .

 

Related Posts
1 of 2,326
सदर घटना ही सरकारी कामात अडथळा आणल्याची होती याची माहिती शहराचे पोलीस उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकडे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख  हे सदर घटनेचा तपास करत असताना त्यांनी भिंगार कॅम्प हद्दीतील सर्व सीसीटीव्ही चेक करून ज्याने बस चालकास हान-मार व दमदाटी केली त्याचे नाव प्रज्योत उर्फ शिवम लोनिया (वय 35 राहणार ब्राह्मण गल्ली भिंगार ) अशी माहिती मिळाली.
भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी लगेच सापळा लावून त्यामध्ये सहाय्यक फौजदार संतोष अडसूळ,पोलीस नाईक रमेश वराट,पोलीस नाईक भानुदास खेडकर,पोलीस नाईक राहुल  द्वारके यांच्या पथकाने आरोपीला अटक केली . दुसरा आरोपी वामन (पूर्ण नाव नाही)असा आरोपी फरार आहे. फरार आरोपी चा शोध सुरू असून पोलीस त्याच्या मागावर ती आहेत  असे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी सांगितले. पुढील तपास सहाय्यक फौजदार संतोष अडसूळ हे करत आहेत
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: