धान्याच्या ट्रकची जबरीचोरी करणारा अटकेत; नगर तालुका पोलीस पोलिसांची कामगिरी

प्रतिनिधी DNA मराठी टीम
अहमदनगर- नगर तालुका पोलिसांनी (Nagar Taluka Police) मोठी कारवाई करत नगर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये धान्याच्या ट्रकची जबरीचोरी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी विकास आनाजी शेळके या आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून नगर तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकाने १४ लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुददेमालहस्तगत केला आहे.
२२ मार्च २०२२ रोजी शहरातील सुवर्णज्योत हॉटेल समोरुन अहमदनगर पुणे रोड येथुन १४ लाख ३० हजार रुपये किंमतीचा मका धांन्य भरलेले ट्रक तीन इसमांनी धाक दाखवुन जबरीचोरी करुन पळवून नेल्याची फिर्याद योगेश मफा वाकडे (रा . शेवगाव ता . शेवगाव जि . अहमदनगर) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिली होती. या फिर्यादीवरून सदर घटनेचा तपास करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना गोपनीय माहिती मिळाली की या घटनेतील मुख्य आरोपी हा विकास आनाजी शेळके आहे.
त्यामुळे त्याला शिरूर (जि-पुणे) तालुक्यातून २५ मार्च २०२२ रोजी अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्याकडून मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला आहे. तसेच इतर दोन फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहे. पुढील तपास नगर तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रणजीत मारग हे करत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल,उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस ठाणेचे सहा . पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप , पोलीस उपनिरिक्षक रणजीत मारग , सफौ दिनकर घोरपडे , पोकॉ विशाल टकले , पोकॉ संदीप जाधव , पोकॉ विक्रांत भालसिंग , पोहेकॉ गणेश लबडे ,पोना रवि सोनटक्के यांनी केली आहे.