अर्र.. मुलीनेच केला वडिलांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल; जाणुन घ्या संपूर्ण प्रकरण

0 208
Bank fraud committed using names of government officials

 

नाशिक – आजोबांनी ठेवलेल्या 26 लाख रुपयांची अफरातफर केल्याने मुलीने वडिलांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी नाशिक (Nashik) येथील मुलीने समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या नाशिक येथे रहात आहेत. त्यांच्या आजोबांनी त्यांच्या हयातील स्थावर व जंगम मिळकतीबाबत 2 मृत्युपत्र करुन ठेवले होते. यापैकी एक नोटराईज्ड असून दुसरे 2010 मध्ये सब रजिस्ट्रार यांच्याकडे नोंदवलेले आहे. या मृत्युपत्रात फिर्यादी यांना वाटा हिस्सा दिलेला आहे.

 

नाशिक येथील मिळकत ही त्यांच्या आजोबांच्या स्वत:च्या कष्टार्जित रक्कमेतून विकत घेतली व त्यामध्ये स्वत: च्या मुलाचे नाव घेतलेले आहे. मात्र, यामध्ये फिर्यादी यांचे वडिल यांनी कोणतीही रक्कम गुंतवलेली नाही. त्यांच्या आजोबांनी ही मिळकत फिर्यादी यांना मिळावी, असे तोंडी सांगितले असून लेखी लिहिलेले आहे. हे मृत्युपत्र त्यांच्या आजोबांनी पुण्यातील घरी ठेवले होते. त्यांचे अचानक निधन झाल्याने त्यांची दोन्ही मृत्युपत्र व मिळकतीसंबंधीचे सर्व कागदपत्रे फिर्यादी यांच्या आत्याच्या कब्जात आहेत. फिर्यादी यांनी या मृत्युपत्राच्या प्रती वडिलांकडे मागितल्या़ त्या देण्यास त्यांनी नकार दिला.

 

Related Posts
1 of 2,326

फिर्यादी यांच्या लग्नासाठी त्यांच्या आजोबांनी अ‍ॅक्सीस म्युचअल फंडात 26 लाख रुपये वेळोवेळी जमा केले होते. फिर्यादी यांच्या वडिलांनी जबरदस्तीने त्यांच्या बचत खात्यावर स्वत:चे नाव लावून घेतले. तसेच फिर्यादी यांच्या परवानगीशिवाय 25 जानेवारी 2018 रोजी 26 लाख रुपये म्युचअल फंडातून काढून अन्य म्युचअल फंडात टाकले. ही रक्कम फिर्यादी यांच्या लग्नासाठी त्यांचे आजोबांनी ठेवलेली होती. या रक्कमेवर त्यांच्या वडिलांचा कोणताही हिस्सा नाही.

 

त्यांनी फसवणूक करण्याच्या इराद्याने या पैशांची अफरातफर (Fraud Case) करुन फिर्यादी यांची फसवणूक केली व ही रक्कम स्वत:चे नावावर करुन ठेवली आहे. फिर्यादी यांच्या आजोबांनी तिचे नावे ठेवलेली रक्कम तिचे वडिलांनी मुद्दाम स्वत:चे नावे अन्य म्युचअल फंडात गुंतवणुक केली, म्हणून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, म्हणून फिर्यादी यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे धाव घेऊन अर्ज केला होता. न्यायालयाच्या निर्णयानुसार समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: