DNA मराठी

अर्र.. ‘या ‘ कारणाने WhatsApp ने पुन्हा बॅन केले १० लाख अकाउंट्स; जाणून घ्या डिटेल्स

0 180
Arr .. For this reason, WhatsApp has again banned 1 million accounts; Learn the details

 प्रतिनिधी DNA मराठी टीम 

मुंबई – जगातील सर्वात लोकप्रिय मेसजींग APP असलेल्या WhatsApp ने नुकताच आपला फेब्रुवारी २०२२ चा मासिक अहवाल जारी केला आहे. या मानसिक अहवालामध्ये WhatsApp ने धक्कादायक खुलासा करत तब्बल एक दशलक्षाहून अधिक अकाउंट्स बॅन केल्याची माहिती दिली आहे. १ ते २८ फेब्रुवारी दरम्यान हे अकाउंट बॅन करण्यात आले आहे.

हानिकारक ऍक्टिव्हिटीज करणे, इतर युजरना त्रास देणे, खोट्या बातम्या व्हायरल करणे यासारख्या अनेक चुकीच्या गोष्टी करणाऱ्या यूजर्सना कंपनीने बॅन केला आहे. शिवाय, कंपनीने वारंवार हेच सांगितले आहे की, प्लॅटफॉर्मवरील सर्व मेसेज एंड-टू-एंड एनक्रिप्टेड आहेत, याचा अर्थ Sender आणि Reciver शिवाय कोणीही मेसेज वाचू शकत नाही. अगदी व्हॉट्सअॅप किंवा अगदी मूळ कंपनी, मेटा (पूर्वीचे फेसबुक) सुद्धा नाही.  

Related Posts
1 of 2,521

WhatsApp च्या प्रवक्त्याने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांपासून आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर आमच्या युजर्सना सुरक्षित ठेवण्यासाठी Artificial inteligene आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञान, डेटा वैज्ञानिक आणि तज्ञ आणि प्रक्रियांमध्ये सातत्याने गुंतवणूक केली आहे. IT नियम 2021 नुसार, आम्ही फेब्रुवारी २०२२ महिन्यासाठी आमचा ९ वा मासिक अहवाल प्रकाशित केला आहे. या युजर -सुरक्षा अहवालात युजर्सच्या तक्रारी आणि WhatsApp द्वारे केलेल्या संबंधित कारवाईचा तपशील आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, जर कोणी बेकायदेशीर, अश्लील, बदनामीकारक, धमकी देणारे, धमकावणारे, त्रास देणारे आणि द्वेष करणारे भाषण, जातीय किंवा वांशिक भेदभाव असणारे मेसेज शेयर करत असेल असेल किंवा कोणत्याही बेकायदेशीर किंवा अनुचित कंटेंटला प्रोत्साहन देत असेल, तर त्याच्या अकाउंटवर बंदी घातली जाते. याशिवाय, जर एखाद्या युजरने WhatsApp च्या नियम आणि नियमांचे उल्लंघन केले तरी त्याचे अकाउंट बंद केले जाते. म्हणून, कोणाला त्रास देणारे काहीच शेयर करू नका. असे केले तरच प्रकारे तुम्ही तुमचे WhatsApp अकाउंट सुरक्षित ठेवू शकाल.(Arr .. For this reason, WhatsApp has again banned 1 million accounts; Learn the details)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: