अर्जुन-मलायका लग्न करणार , अरबाज खान ने दिली “ही” प्रतिक्रिया

0 2,620

नवी मुंबई – बॉलिवुड (Bollywood)  मध्ये एकेकाळी सर्वात लोकप्रिय कपल म्हणून ओळखले जाणारे अभिनेता अरबाज खान (Arbaaz khan) आणि अभिनेत्री मलायका अरोरा (malaika arora) हे दोघे 2017 मध्ये कायदेशीररित्या घटस्फोट एकमेकांपासून दूर झाले. (Arjun-Malaika will get married, Arbaaz Khan gave “this” reaction)

आज या दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या असून ते त्यांच्या आयुष्यात पुढे मार्गस्थ झाले आहेत. मलायका अभिनेता अर्जुन कपूरला (Arjun kapoor) डेट करत आहे. तर, अरबाज मॉडेल जॉर्जिया एंड्रियानी (Georgia Andriani) हिला डेट करत आहे.माञ तरीही या दोघांबद्दल सोशल मीडियावर बातम्या येतच राहतात.

नुकताच अरबाजची एक मुलाखत चर्चेत आली आहे. अरबाज पहिल्यांदाच मलायका- अर्जुनच्या नात्यावर व्यक्त झाला आहे. मलायका आणि अर्जुन यांचं नात आता कोणापासूनही लपलेलं नाही. अनेकदा ही जोडी प्रसारमाध्यमांसमोर खुलेपणाने वावरत असते. त्यामुळे मलायका-अर्जुन लग्न कधी करणार हा प्रश्न चाहते विचारतांना दिसतात. अरबाजसोबत घटस्फोट झाल्यानंतर अनेकदा मलायकाने तिच्या नातेसंबंधांवर भाष्य केलं होतं. परंतु, अरबाजने पहिल्यांदाच तिची प्रतिक्रिया दिली आहे.

पिंच इन मुंबई’च्या लाँचिंगवेळी अरबाजला मलायका- अर्जुनच्या लग्नाविषयीचा प्रश्न विचारण्यात आला. मात्र, अरबाजने यावर शिताफीने उत्तर देत भाष्य करणं टाळलं. पापाजी, फार विचारपूर्वक प्रश्न विचारला आहे. नक्कीच हा प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही रात्रभर विचार केला असेल. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणं मला भाग आहे, असं अरबाज म्हणाला.

पुढे तो म्हणतो, पण आता हा प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही इतका विचार केला आहे. तर, सहाजिकच मलादेखील विचार करायला थोडा वेळ द्या. मी उद्या या प्रश्नाचं उत्तर दिलं तर चालेल?

Related Posts
1 of 84

पोलीस भरती पेपर फुटल्याची अफवा, तरुणावर गुन्हा दाखल , जाणुन घ्या संपूर्ण माहिती

दरम्यान अरबाजने दिलेलं हे उत्तर ऐकून त्याने वेळ मारुन नेल्याचं पाहायला मिळालं. परंतु, मलायका आणि अर्जुन यांच्या लग्नाच्या दररोज चाहत्यांमध्ये चर्चा रंगत असतात. एका मुलाखतीतही मलायकाने तिच्या वेडिंग प्लॅनविषयी भाष्य केलं होतं. त्यामुळे या लग्नाच्या चर्चांना चांगलाच जोर आला आहे.(Arjun-Malaika will get married, Arbaaz Khan gave “this” reaction)

हे पण पहा – नऊ ते दहा दिवसात चौकशी पूर्ण करून शासनाला अहवाल दिला जाईल – राधाकृष्ण गमे

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: