लग्न समारंभात वाद वादात महिलेचा मृत्यू पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दोन जण ताब्यात
पाथर्डी येथे लग्नासाठी आलेल्या दोन गटांमध्ये वाद झाल्याने यात एक जखमी तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे

अहमदनगर :- पाथर्डी तालुक्यातील कीर्तनेवाडी येथे लग्न समारंभासाठी आलेल्या कुटुंबाचाबडे वाडी येथे दहाव्याच्या कार्यक्रमात शहादेव धायतडक आणि बाळासाहेब शिरसाट यांच्यात किरकोळ वाद झाला होता याचा राग आल्याने कीर्तने वाडी येथे सुरूअसलेल्या लग्न समारंभामध्ये शिरसाट आणि कीर्तने कुटुंबात वाद झाला हे भांडण सुरू असताना सुशीला कीर्तने या भांडण सोडवण्यासाठी गेले असता शुभम घातक याने त्यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केली या त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात असून पोलिसांनी मयत महीलेचा मेहुणा व त्याचा मुलगा असे दोघांना ताब्यात घेतले आहे.
त्या संचालकांचे अज्ञानच समोर येतेय…
पाथर्डी. माझ्या घरी शुभ कार्य आहे . तुम्ही येथे वाद करु नका असे सांगितल्याचा राग आल्याने लाकडी दांडक्याने डोक्यात मारुन माझ्या पत्नीचा खुन केला. माझे चुलते यांना जखमी केले आहे. सोमवारी दुपारी एक वाजता किर्तनवाडी येथे ही घटना घडली. भांडण सोडविण्याचा प्रयत्न करणारी सुशाला राजेंद्र किर्तने (वय -४३ वर्षे) ही मयत झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी
मयत महीलेचा मेहुणा व त्याचा मुलगा असे दोघांना ताब्यात घेतले आहे. सुशाला किर्तने यांच्या मुलाचा रविवारी तिसगाव तेथे विवाह झाला.सोमवारी बडे वाडी येथे दहाव्याच्या कार्यक्रमात शहादेव धायतडक व बाळासाहेब शिरसाट यांच्यात किरकोळ वाद झाला. बाळासाहेब शिरसाट हा सुशालाचा भाऊ आहे. तो बडेवाडी येथे वाद झाल्यानंतर किर्तनवाडी येथे आला.
त्यानंतर सुशाला
किर्तने यांचा मेहुणा शहादेव धायतडक,शुभम धायतडक व शुभमचे चार सहकारी असे सहाजण किर्तनवाडी येथे तिन मोटारसायकल वरुन आले. त्यांच्याकडे धारदार हत्यारे होती. राजेंद्र किर्तने यांच्या घरी पुन्हा वाद पेटला. यावेळी राजेंद्र किर्तने ,सुशाला किर्तने व भागवत किर्तने वाद सोडविण्यासाठी मधे गेले. सुशाला हीच्या डोक्यात शुभम धायतडक याने दांडक्याने जोरात फटका
मारला. ति जमीनीवर पडली व बेशुद्ध झाली. धनाजी नामदेव किर्तने हे जखमी झाले आहेत. यातील चौघेजण पळुन गेले. त्यानंतर शहादेव व शुभम धायतडक यांना ग्रामस्थांनी पकडुन ठेवले. सुशाला हीस उपचारासाठी खरवंडी व त्यानंतर पाथर्डी येथील खाजगी दवाखान्यात आणले. डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.
मयत महीलेचे पती राजेंद्र किर्तने यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. शहादेव रामकिसन धायतडक, शुभम शहादेव धायतडक, रणजीत आजिनाथ धायतडक, अक्षय सखाराम धायतडक रा. धायतडकवाडी, संदीप बाळासाहेब शिरसाट (पिंपळगावटप्पा) ,सोमनाथ गणपत घुले (शेकटे) यांच्या विरु्दध पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर पोलिस तातडीने किर्तनवाडी येथे पोहचले. ग्रामस्थांनी पकडुन ठेवलेले शहादेव धायतडक, व शुभम धायतडक रा. धायतडकवाडी,ता.पाथर्डी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ग्रामिणचे पोलिस उपअधिक्षक अजित पाटील यांनी पाथर्डी पोलिस ठाण्याला भेट दिली.
घटनेची माहीती घेतली.पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे ,सहायय्क पोलिस निरीक्षक रामेश्वर कायंदे , कौशल्य रामनिरंजन वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली. वाघ तपास करीत आहेत. चौकट- मयत सुशाला राजेंद्र किर्तने हीच्या मुलाचे कालच लग्न झाले होते. आज धायतडकवाडी येथील शहादेव धायतडक, शुभम धायतडक व त्यांचे चार सहकारी किर्तनवाडी येथे गेले. तेथे वाद सुरु असताना मयत सुशाला किर्तने ही वाद सोडविण्यासाठी मधे गेली होती. तेथे तिचा मृत्यु झाला. काल वरमाई म्हणुन मिरणारी सुशाला किर्तने सोमवारी मुलाची हळद फिटताच मयत झाल्याने किर्तनवाडीच्या ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे.