DNA मराठी

बेलवंडी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी! 9 वर्षीय अपहरण झालेली ऊसतोड कामगारांची मुलगी 12 तासाच्या आत पालकांच्या स्वाधीन…

0 22
Destroyed two lakh eighty four thousand rupees worth of domestic and foreign liquor.

 

श्रीगोंदा : तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढवळगाव येथील साजन शुगर साखर कारखाना परिसरात उसतोडीसाठी आलेले कामगार नामे सुनील दशरथ पावरा हे आपली पत्नी व पाच मुलांसह कारखान्यासमोरील मोकळ्या जागेत पाल टाकुन राहत असताना दिनांक २७ जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे कुटूंबीयासह झोपले असता सकाळी सहा वाजता उठल्यानंतर त्यांना त्यांची मोठी मुलगी रविता वय वर्ष ९ ही झोपलेली आढळुन आली नाही.

त्यामुळे त्यांनी दिवसभर आपले सोबतच्या कामगारासोबत परीसरांत शोध घेतला हताश होऊन मुलगी मिळुन न आलेने रात्री ९ वाजता बेलवंडी पोलीस स्टेशनला माहीती देण्यासाठी आले.

तक्रारदारांना विचारपुस करुन व मुलीचे वय पाहता घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे व पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे यांनी आपल्या स्टाफसह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी शहानिशा केल्यानंतर रविता हीस कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणाकरीता पळवुन नेलेबाबत खात्री झाल्याने पीडीतेचे वडील सुनील दशरथ पावरा वय ३८ वर्ष रा.देवळी आडगांव ता.चाळीसगांव याचे फिर्यादिवरुन भा.दं.वि. कलम ३६३ प्रमाणे बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्वतःकडे तपास घेतला.

अपहरण झालेल्या मुलीबाबत परीसरांतील नागरीकांशी तसेच पोलीस पाटील यांचेशी संपर्क करुन माहीती घेत असतांनाच स्थानीक नागरीकांच्या विवीध व्हॉटसअप ग्रुपवर मुलीचे फोटो व वर्णनासह माहीती प्रसारीत करण्यात आली. त्यावेळी माठ येथील श्री. उमेश घेगडे व महेश महाडीक रा.उकडगांव यांनी सदर मिळतेजुळते वर्णनाची मुलगी ही उकडगांव बसस्टॅन्डवर लहान बाळासह असल्याचे पोलीसांना फोनद्वारे सांगीतले.

Related Posts
1 of 2,448

त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री.दिनेश आहेर व त्यांचे सोबतचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन अपहरण झालेली मुलगी तीच असल्याची खात्री झाल्याने तीचेकडे अधिक विचारपुस केली असता तीस एक आदिवासी समाजाच्या महीलेने सदरची मुलगी पालाचे बाहेर लघवीस गेलेली असतांना पहाटेचे वेळी बळजबरीने घेवुन आली असल्याचे सांगीतले. त्यावरुन सदर आरोपी महीला सुप्रिया सचीन काळे वय २२ वर्ष रा. सातववाडी अरणगांव दुमाला ता.श्रीगोंदा हीस ताब्यात घेण्यात आलेले असुन पुढील कारवाई करण्यात आली आहे.

सदर ची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे साहेब, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बेलवंडी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे,पीएसआय राजेंद्र चाटे,स. फौ.मारुती कोळपे, स. फौ. रावसाहेब शिंदे, हे कॉ. डी आर.पठारे,पो. कॉ. कैलास शिपनकर, पो कॉ.पवार,पो. कॉ. संदीप दिवटे पो. कॉ. सतिश शिंदे, चालक विकास सोनवणे, भाऊसाहेब शिंदे यांच्या पथकाने केली आहे.

12 तासाच्या आत मुलगी शोधून आरोपी महिलेला अटक केल्याप्रकरणी कारखाना प्रशासन व बेलवंडी ग्रामस्थ यांच्या वतीने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे, उपनिरीक्षक राजेंद्र चाटे यांचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला. यावेळी बेलवंडीचे सरपंच ऋषिकेश शेलार,शेतकी अधिकारी नवनाथ देवकर, माऊली नाना पाचपुते, नानाभाऊ हिरवे, दिलीप रांगोळे,अशोक शेलार,संदीप घाडगे,प्रदीप इथापे, रामभाऊ शेलार, आदींनी अभिनंदन केले.

बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीत कोणी लहान मुले संशयास्पद,अनोळखी व्यक्ती आढळल्यास तात्काळ बेलवंडी पोलिसांशी संपर्क करावा. असे आवाहन बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश आहेर यांनी केले आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: