Apple देणार चाहत्यांना जोरदार धक्का; iPhone ची ‘ही’ सीरिज होणार बंद

0 150
Apple will give fans a big shock; The iPhone's 'this' series will be discontinued
 मुंबई –   Apple नेहमी आपल्या युजर्ससाठी काहींना  काही नवीन मॉडेल्स लॉन्च करतच असते. तसेच जुने मॉडेल्स बंद करते किंवा त्यांची किंमत कमी करते. यामुळे ग्राहकांना नव्या डिवाइसेजच्या माध्यमातून चांगला अनुभव मिळत राहतो. मात्र आता यावेळी Apple आपल्या यूजर्सना धक्का देणार आहे.  Apple iPhone 11 सीरिज बंद करणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
यावर्षीच्या शेवटी कंपनी iPhone 14 सीरीज लाँच करणार आहे. परंतु ही नवीन सीरिज येताच लोकप्रिय Apple iPhone 11 सीरिज बंद केली जाऊ शकते. यावर्षीच्या शेवटी येणारी नवीन स्मार्टफोन सीरिज Apple iPhone 13 सीरीजची जागा घेईल.
Related Posts
1 of 2,397

परंतु त्याचबरोबर iPhone 11 सीरीज बंद करण्याचं काम देखील करण्यात येईल, अशी माहिती iDropNews नं दिली आहे. विशेष म्हणजे iPhone 11 सीरिजमुळे ग्राहक नव्या iPhone SE 2022 कडे लक्ष देत नाहीत. सर्वात स्वस्त 5G आयफोनची विक्री वाढवण्यासाठी देखील कंपनी iPhone 11 बाजारातून हटवू शकते. 2019 मध्ये आलेला Apple iPhone 11 स्मार्टफोन 2020 मध्ये जगभरात सर्वाधिक विकला गेलेला स्मार्टफोन होता.

iPhone 11 बंद करण्यामागे अनेक कारणं सांगितली जात आहेत. यातील एक कारण म्हणजे iPhone SE 2022 च्या तुलनेत iPhone 11 खूप जुना आणि स्लो फोन आहे. परंतु यात मोठा डिस्प्ले आणि जास्त कॅमेरे असल्यामुळे लोक जुन्या फ्लॅगशिपची निवड करत आहेत. परिणामी iPhone SE 2022 ची विक्री कंपनीच्या अपेक्षेपेक्षा कमी होत आहे. म्हणून कदाचित हा निर्णय घेतला जाऊ शकतो.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: