श्रीगोंदा तालुक्यात बहरणार सफरचंदाच्या बागा

0 12
श्रीगोंदा  –  ऊस आणि कागदी लिंबू बागांचे आगार अशी ओळख असलेल्या श्रीगोंदा तालुक्यात आता द्राक्षे, डाळींबानंतर सफरचंदाच्या बागा बहरणार आहे. रंगनाथ रामभाऊ कळमकर आणि विजयराव केदारे यांच्या मांडवगण रोडवरील बागेत सफरचंदाच्या झाडांच्या फुलांचा बहर पाहण्यासारखा आहे. सहाशे झाडांचा बहर यंदा सफरचंदाचे उत्पन्न देणार आहे. तर टाकळीकडेवळीत येथे खामकर बंधूंनी दिड एकर क्षेत्रावर सफरचंदाच्या चारशे वीस रोपांची यंदा लागवड केली आहे.
  व्यावसायिक तत्वावर होणारी सफरचंदाची लागवड आता वाढत चालली आहे. उष्ण प्रदेशात येणारे सफरचंदाचे वाण विकसित करणारे हिमाचल प्रदेशातील प्रसिद्ध शेतकरी हरिमन शर्मा यांच्या यशस्वी प्रयोगांचा अभ्यास करुन टाकळीकडेवळीत येथील राजेंद्र आणि योगीराज खामकर बंधूंनी सफरचंदाची बाग फुलविण्याचे ठरविले. इंटरनेटच्या माध्यमातून सखोल अभ्यास केला. राजस्थान आणि गुजरात या उष्ण प्रदेशात येणारे एचआरएमएन – ९९ हे वाण लागवडीसाठी निवडले. हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथून रोपे मागवली.

 पाणी साठवून न राहणारी, निचरा होणारी ५० गुंठे जमिन तयार केली. बारा बाय अकरा फुट अंतरावर दोन फुट खोल खड्डे घेऊन त्यामध्ये तुरीचा भुसा, ऊसाच्या पाचरटाचा भुगा आणि शेणखत टाकून कंपोस्ट खत तयार केले. सिंचनासाठी ठिबकची व्यवस्था केली. ८० रुपये प्रतिरोप या दराने एचआरएमएन – ९९ या वाणाची ३८० तर गोल्डन डाॅरसेट आणि ॲनी या वाणाची प्रत्येकी २० रोपे मागविली. मागणी केल्याप्रमाणे रोपे शेतामध्ये पोहोच झाली.

 

काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील हिमालयाच्या पहाडी भागामध्ये आढळणा-या सफरचंद लागवडीचा रंगनाथ कळमकर, विजयराव केदारे आणि टाकळीकडेवळीत येथील खामकर बंधूंचा प्रयोग परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. बहार धरण्यासाठी लागवडीनंतर दोन वर्षे वाट पाहावी लागते. दुस-या वर्षी प्रायोगिक तत्वावर तर तिस-या वर्षी पूर्ण क्षमतेने बहार धरता येतो. कळमकर आणि केदारे यांच्या सफरचंदाच्या झाडाला यावर्षी चांगला बहर आला आहे. फुलांनी लढून गेलेली सफरचंदाची झाडे पाहण्यासारखी आहेत. खामकर बंधूंनी लागवड झालेली सर्व रोपे यशस्वीपणे वाढीला लागली आहेत.
Related Posts
1 of 1,290
प्रतिक्रिया :
पारंपारिक शेती ऐवजी वेगळी वाट निवडण्याचा आम्ही प्रयत्न आम्ही केला असून हिमाचल प्रदेशातील हरिमन शर्मा यांच्या नर्सरीमधून उष्ण प्रदेशात येणारे सफरचंदाच्या वाणाची लागवड केली आहे.
राजेंद्र आणि योगीराज दत्तात्रय खामकर, टाकळीकडेवळीत.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: