
सत्ता असूनही नगर-मनमाड रस्ता का होत नाही…
संगमनेर : सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून महाविकास आघाडी सरकारने शेतकरी कर्जमाफी सह लोककल्याणाचे अनेक निर्णय घेतले. भाजपची कार्यपद्धती जनतेला मान्य नसून खड्ड्यांचा रस्ता म्हणून मृत्यू सापळा बनलेला नगर-मनमाड रस्ता वर्षानुवर्ष सत्ता असून का होत नाही असा सवाल करतानाच शिर्डी मतदारसंघातील दहशतीचे झाकण उडवा असे आवाहन काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलेे.
गौतमी पाटीलची लावणी , तरुणांनी गोंधळ उडाला, पोलिसांनी लाठीचार्ज.
राहाता येथे महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आ. डॉ. सुधीर तांबे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंकज लोंढे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुधीर म्हस्के, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, मुजीबभाई शेख, महेंद्र शेळके, अनिल भांगरे, तालुकाप्रमुख सचिन कोते, रावसाहेब बोठे, डॉ. एकनाथ गोंदकर, लताताई डांगे, सुरेश थोरात, श्रीकांत मापारी, प्रभावती घोगरे, जनार्दन घोगरे, विक्रांत दंडवते, समीर दंडवते, समीर करमासे, नंदकुमार सदाफळ, अण्णा कोते, महेंद्र शेळके, सुभाष निर्मळ, अरुण पा. कडू, प्रवक्ते ताराचंद म्हस्के, शीतल लहारे, मामा पगारे आदी उपस्थित होते.
मतदार मतदानाला मुकले….
आमदार थोरात म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने अत्यंत सहज पद्धतीने शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतची कर्जमाफी केली. कोरोना काळात या सरकारने चांगले काम केल्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक झाले. मात्र मागील नऊ महिन्यापासून आलेल्या सरकारने एकमेकांवर केलेले आरोप, त्यांचीी वागण्याची पद्धत पाहता राजकारणाचा पोत सध्या रसातळाला गेला आहे. सुप्रीम कोर्टातून नक्की न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त करताना त्याच क्षणाला राज्यातील सरकार कोसळेल. कारण भाजपची कार्यपद्धती जनतेला मान्य नाही. ३५६० किलोमीटर पदयात्रा करणाऱ्या राहुल गांधींच्या प्रश्नाला देशाचे पंतप्रधान उत्तर देत नाहीत. महागाई, बेरोजगारी वरून लक्ष हटवण्याकरता धार्मिक मुद्दे पुढे केले जात आहेत. राज्यांमध्ये महाविकास आघाडीला अत्यंत अनुकूल वातावरण आहे. राहाता तालुका पूर्वी वैभवशाली तालुका होता ४० ट्रक पेरू या तालुक्यातून जात होते. ऊस, पाटपाणी अशी समृद्धी असलेल्या या तालुक्याचा विकास खुंटला आहे. इतकी वर्ष घरात सत्ता असताना नगर-मनमाड रस्ता का होत नाही. यामुळे हा खड्ड्यांचा व मृत्यू सापळा असलेला रस्ता म्हणून राज्यात कुप्रसिद्ध झाला आहे. आपण लोकशाही मानणारे आहोत. कधीही इतर तालुक्यांमध्ये ढवळाढवळ केली नाही. मात्र येथील दहशतीला लोक आता कंटाळले आहेत. सर्वांनी एकत्र येऊन सर्व निवडणुका लढवा. शिर्डी मतदार संघातील दहशतीचे झाकण जनतेच्या एकीतून उडवायचे आहे.
शेती महामंडळाचा साठ वर्ष सुरू असलेल्या लढा आपण महसूल मंत्री झाल्यानंतर तातडीने सोडवला. मात्र या प्रश्नाच्या संघर्षाला इतकी वर्ष का लागली हे ओळखा. याचे कारण म्हणजे जनतेला पिचवत ठेवण्याचे, झुलवत ठेवायचे हे येथील राजकारण आहे. आपण सर्वसामान्य जनतेबरोबर असून लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी मजबूतपणे एकत्र या, असे आवाहन त्यांनी केले.