ऑन दि जॉब ट्रेनिंगला प्रवेशासाठी आवाहन , आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी

0 945

पुणे –   केंद्र सरकारने तरुण व गरजू विद्यार्थ्यांसाठी शिका व कमवा योजनेतंर्गत ऑन दि जॉब (on-the-job) ट्रेनिंगची संकल्पना सुरू केली आहे. यामध्ये इच्छुक उमेदवारांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे. या योजनेतून पुण्याच्या श्री कन्सल्टन्सी, कौशल्य विकास व परीक्षा मंडळ विभाग आणि जॉब्स युनिव्हर्सिटीतर्फे विविध प्रकल्प राबविले जात आहेत. (Appeal for admission to on-the-job training, opportunity to work in a field of interest)

यासाठी इच्छुकांनी त्वरित संपर्क साधून प्रवेश अर्ज सादर करण्याचे आवाहन श्री कन्सल्टन्सीचे संचालक शिवानंद बाहेकर, दिपक काळे व धनंजय घुले यांनी केले आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत इच्छुक उमेदवारांनी जिल्हा व तालुका प्रतिनिधींकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज भरण्यासाठी कोणताही खर्च नाही. उमेदवाराला ऑन द जॉब ट्रेनिंग बंधनकारक आहे. त्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.
Related Posts
1 of 1,481
या प्रकल्पात प्रामुख्याने आरोग्य, बँकींग क्षेत्रासह १८४ विभागांचा समावेश आहे. प्रवेश प्रक्रियेनंतर नियोजित पद्धतीने उमेदवाराची तोंडी व लेखी परीक्षा पूर्ण करुन बेसिक प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक आहे. उमेदवाराच्या क्षमतेनुसार ए व बी ग्रेड मिळालेला उमेदवार प्रात्यक्षिक प्रशिक्षणासाठी निश्चित अस्थापनेकडे पाठविले जातात. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पूर्णवेळ किंवा कायमस्वरुपी त्या अस्थापनेत त्यांना कायम करण्यात येते. प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना दरमहा पाच ते बारा हजारपर्यंत मानधन देण्यात येते. (Appeal for admission to on-the-job training, opportunity to work in a field of interest)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: