DNA मराठी

शहरात उद्यापासून अतिक्रमण हटाव मोहीम; पोलिसांचा फौजफाटा तैनात

0 545
Anti-encroachment campaign in the city from tomorrow; Police force deployed
 
श्रीगोंदा – श्रीगोंदा शहरात उद्या दि 25 मे ते दि 28 मे या कालावधीत मुख्य रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे हटवण्यात येणार असल्याची माहिती श्रीगोंदा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी दिली. नगरपरिषद हद्दीतील नगर दौंड रस्ता,मांडवगण रस्ता,शनिचौक ते बागडे कॉर्नर रस्ता,वडाळी रस्ता अश्या मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवली जाणार आहेत अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यासाठी दंगल नियंत्रण पथकासह जवळपास 50 ते 60 पोलिसांचा फौजफाटा उद्या तैनात करण्यात आला आहे. अतिक्रमण हटवण्याबाबत श्रीगोंदा नगरपरिषदेने वर्तमानपत्रात जाहीर नोटीस दिली होती त्यामुळे अनेक व्यवसायिकांनी आजच आपली अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्यास सुरुवात केली आहे.
कारवाईबाबत संभ्रम
उद्या राबवण्यात येणाऱ्या अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असून यात मोठ्या व्यवसायिकांना अभय आणि छोट्या व्यवसायिकांवर अन्याय होत असल्याची भावना अनेक छोट्या टपरीधारक व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे शहरात अनेक मोठ्या व्यावसायिकांची काही राजकीय नेत्यांची अतिक्रमणे आहेत आधी ती अतिक्रमणें नगरपरिषदेने काढावीत असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे तर अतिक्रमणे कोणत्याही परिस्थितीत हटवली जाणारच असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

टपरीधारक व्यावसायिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी
दरम्यान ज्या टपरीधारक व्यवसायिकांचे अतिक्रमण हटवण्यात येणार आहे त्या व्यवसायिकांना पालिकेने व्यवसायासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे तर अतिक्रमण हटवल्यामुळे शहराचा श्वास मोकळा होणार असून वाहतुकीस होणारा अडथळा दूर होण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: